ग्रामपंचायत पोट निवडणूक 2023 गडचिरोली जिल्ह्यातील पोट निवडणूक मतमोजणी तारखेत बदल… — मतमोजणी आता 19 मे ऐवजी 20 मे 2023 रोजी होणार…

सतिश कडार्ला

प्रतिनिधी

गडचिरोली,(जिमाका)दि.19: उपायुक्त, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे आदेशान्वये, दिनांक 06 एप्रिल 2020 अन्वये निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य/थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांकरिता पारंपारिक पध्दतीने निवडणूक कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यात घोषित करण्यात आले होते. त्याअनुषंगाने मतमोजणीचा दिनांक दि.19 मे 2023 (शुक्रवार) घोषित करण्यात आले होते. परंतु गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त असून जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मतमोजणी सुरळितपणे पार पडावी म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील मतमोजणी दिनांक 19 मे 2023 ऐवजी दिनांक 20 मे 2023 रोजी करण्यात येणार आहे. असे उपसचिव राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी कळविले आहे.