नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या नागपूर विभागीय कार्यालय अंतर्गत साकोली शाखा कार्यालयात विमा क्षेत्रात आपल्या कार्य कुशलतेने स्वतःच्या विमा केंद्रामध्ये व मागील आर्थिक वर्षात सी एल आय ए लीडर शिप मध्ये नाव चमकविणारी पुजा कुरंजेकर सी एल आय ए साकोली शाखेत पॉलिसी मध्ये दुसऱ्या स्थानावर व नागपूर विभागाच्या सी एल आय ए ३१.०३.२०२३ यादीत २५ प्रतिनिधींतून अकराव्या स्थानावर असून नागपूर व साकोली विभागात पुजा कुरंजेकर ह्या प्रथमच महिलेने उच्च शिखर गाठून महिलेत अव्वल स्थानावर बाजी मारली आहे.
अगदी दोन वर्षाच्या सी एल आय ए लीडर शिपच्या कारकिर्दीत या स्टेज पर्यंत कमी कालावधीत पोहचणारी नागपूर विभगातील पहिली महिला अभिकर्ता पुजा कुरंजेकर ही ठरली आहे. आज साकोली शाखेतच नाही तर नागपूर विभागात हिच्या कार्याची प्रशंसा केली जाते हे विशेष. पुजा कुरंजेकर यांनी आपल्या यशाचे श्रेय समुह मधील सर्व अभिकर्त्यांना व साकोली शाखेतील सहायक शाखाधिकारी उमेश लिंगलवार व सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे यांना दिले आहे. तसेच नागपूर विभागातील सी एल आय ए मॅनेजर लटारे सर यांना दिले आहे. विशेष करून ज्यांच्या मार्गदर्शनामुळे अभिकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी मदत झाली व अभिकर्त्यानी आपले यशस्वी योगदान दिले अशा चंदु लिखार यांना याचे श्रेय दिले आहे.