प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
ठेवीदारांच्या दैनंदिन रोख ठेवी अन्वये राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिमूरची तात्कालीन वार्षिक उलाढाल ५ करोड ६३ लाख ७३ हजार ९४० रुपये होती आणि या उलाढाली अंतर्गत तथा संचालक मंडळाच्या मंजूरी नंतर ५ करोड १० लाख ९४ हजार २३४ रुपये ९७ पैसांचे सभासद कर्ज वाटप करण्यात आले होते.
उलाढाल रक्कम मधून कर्ज रक्कम वजा केली तर ५२ लाख ७९ हजार ७०६ रुपये शिल्लक होती असे लक्षात येते.यामुळे ५२ लाख ७९ हजार ७०६ रुपये सदर संस्थेत शिल्लक असताना याच कालखंडातंर्गत झालेल्या चाचणी आॅडीटला अनुसरून ७ करोड ६६ लाख ९० हजार ५१० रुपयांची अफरातफर तात्कालीन व्यवस्थापक मारोती पेंदोर,माजी उपाध्यक्ष अरुण मेहरकुरे,अमोल मेहरकुरे,अतुल मेहरकुरे यांनी कसी काय केली?हे समजण्यापलिकडचे कोडे निदर्शनास येते आहे.
कर्ज आणि रोख रक्कम विड्राल अंतर्गत रुपयांची अफरातफर केली जात नाही.मात्र लेखा परिक्षक राजेश लांडगे यांनी कर्ज व रोख रक्कम विड्राल ला अनुसरून अमोल मेहरकुरे व अतुल मेहरकुरे यांना बेकायदेशीर जबाबदार धरले आहे.
याचबरोबर अमोल मेहरकुरे व अतुल मेहरकुरे यांनी ठेवीदारांच्या दैनंदिन जमा रक्कमा संस्थेत विड्राल अंतर्गत नियमित जमा केले होते.तद्वतच कुणाला कर्ज मंजूर करायचे हा अधिकार संचालक मंडळाचा आहे.असे असताना दैनंदिन रोख रक्कम जमा संबधाने अतुल मेहरकुरे व अमोल मेहरकुरे यांना चाचणी आॅडीट अन्वये उपलेखा परिक्षक राजेश लांडगे यांनी ७० खातेदारांच्या नावांपुढे जबाबदार धरले आहे.चाचणी आॅडीटरचा हा सावळा गोंधळ सुध्दा शकाजनक दिसतो आहे.
संस्था निधी १ कोटी ११ लाख ३ हजार ३८६ रुपये व इतर निधी जैसे थे सुरक्षित असताना आणि ठेव रक्कमेच्या अंतर्गत सभासद कर्ज वितरण झाले असताना अरुण मेहरकुरे कुटुंबातील सर्व सदस्यांनी व माजी व्यवस्थापक श्री.मारोती पेंदोर यांनी करोडो रुपयांची अफरातफर केली असे कोणत्या आधारावर चाचणी आॅडीट अन्वये पुढे आणले गेले हेच कळायला मार्ग नाही.
संस्थेची उलाढाल रक्कम,ठेव रक्कम आणि इतर सर्व प्रकारच्या रक्कमा संस्थेच्या कागदपत्रांवरून बघितल्यानंतर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असे दिसून येत नाही.यामुळे चाचणी आॅडीट म्हणजे नेमके काय? आणि या चाचणी आॅडीट चा मुख्य हेतू नेमका काय होता? याबाबत अनेक प्रकारचे गंभीर प्रश्न निर्माण होतात.
मात्र,करोडो रुपयांचे रोख कर्ज वितरण अंतर्गत ठेवीदारांचे रुपये सुरक्षित असताना संस्थेच्या ठेवीदारांत संभ्रमावस्था व अविश्वसनीयता कुणी केली?आणि कशासाठी केली? याचा छडा निष्पक्षपणे साहाय्यक निबंधक लावतील काय?
एखाद्या संस्थेच्या आर्थिक व इतर घडामोडी अंतर्गत प्रकरण न्यायप्रविष्ट झाले असेल तर त्या घडामोडीला अनुसरून कुणाला आरोप प्रत्यारोप करता येत नाही व सार्वजनिक कुणाचीही बदनामी करता येत नाही.तद्वतच न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागते.
असे असताना माजी व्यवस्थापक श्री.मारोती पेंदोर व अरुण मेहरकुरे व त्यांच्या कुटुंबीयांची वर्तमानपत्राच्या माध्यमातून वारंवार सार्वजनिक बदनामी का म्हणून केली जात आहे.आणि त्यांच्या बदनामी मागचा खलनायक शुत्रधार कोण आहे हे ठेवीदारांनी वेळ न दवडता ओळखले पाहिजे.
अरुण मेहरकुरे हे इज्जत दावा व मानहानी दावा करण्यासंबंधाने तयारीला लागले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.