आम्ही ( भारतीय सर्वसामान्य जनता ) जगतो कोणत्या देशात….स्वातंत्र्यापूर्वीच्या की नंतरच्या……!

     स्वातंत्र्यापुर्वी इंग्रजराजवटीत आम्ही आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही इंग्रजांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध उठाव करण्यासाठी जनजागृती करत असू.

      आज आमच्यावर त्याहीपेक्षा अन्याय होतो. त्या विरोधात कुणाला जबाबदार धरून आम्ही कुणात, कुणासाठी आणि कुणी जनजागृती करायची…..?

  कारण देशात लोकशाही राहिलेली नाही…….

 देशाला प्रधानमंत्री राहिलेला नाही……..

 देशाला राष्ट्रपती राहिलेले नाहीत…….

देशाला सर्वोच्च न्यायालय राहिलेले नाहीत……

 देशाला संसद राहिलेली नाही…….

 देशात केंद्रीय मंत्रिमंडळ राहिलेले नाही…….

 देशाला मुख्य निवडणूक आयोग राहिलेला नाही…….

 देशाला महानियंत्रक ( CAG ) राहिलेला नाही………

 देशात पत्रकारिता राहिलेली नाही…….

   देशात टी. व्ही. चॅनल्स राहिलेले नाहीत……..

 महाराष्ट्रात राज्यसरकार अस्तित्वात नाही……..

 राज्याला मुख्यमंत्री राहिलेला नाही……

 राज्यात विधानसभा / विधान परिषद अस्तित्वात नाही……..

 राज्याला मंत्रिमंडळ राहिलेले नाही…….

   राज्याला राज्यपाल राहिलेले नाहीत………

 राज्याला उच्चं न्यायालय राहिलेले नाही……..

    राज्यात विभागीय आयुक्त राहिलेले नाहीत…….

   राज्यातील जिल्ह्याना जिल्हाधिकारी राहिलेले नाहीत…….

   तालुक्याला तहसीलदार राहिलेले नाहीत……..

    गावात सरपंच / ग्रामपंचायत सदस्य राहिलेले नाहीत…....

  गावात तलाठी / ग्रामसेवक राहिलेले नाहीत…….

या देशात आणि राज्यात पी. एच. डी.धारक प्राध्यापक राहिलेले नाहीत…….

      म्हणूनच……

 वरील सर्वांच्या बेजबाबदारपणामुळे आणि षंढपणामुळे आणि विशेषतः पाऊणेचार हजार वर्षांपूर्वी बाहेरून आलेल्या आर्याच्या म्हणजेच आताच्या साम, दाम, दंड आणि भेदधारी बामणांच्या नीच वृत्तीमुळे. ज्या वृतीला मी मी म्हणणारे लाचार होऊन बळी पडले (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वाभिमान शिकविलेला असतांना सुद्धा )……..!

    या संपूर्ण देशात आणि पुरोगामी महाराष्ट्रातील ” निरागस रांगतं बाळ ( सर्वसामान्य जनता )” विस्तवात पडून जळून मरण्याची शक्यता जास्त निर्माण झाली आहे.  

    एकूणच संपूर्ण देशात आणि राज्यात…………

  संविधानिक संस्था…

  राहिलेल्या नाहीत……!!!

  तर मग आहे काय….?

या देशात शिल्लक….!

या देशात एक गोष्ट मात्र निश्चितच शिल्लक आहे………

आणि तेही चढत्या आलेखाप्रमाणे मजबूत होत गेलेली……

     ती गोष्ट म्हणजे………

मनुस्मृती ( कूसंस्कृती)

       या कुसंस्कृतीने गेल्या 75 वर्षात सुरुवातीला गोगलगायीची, 1976 नंतर कासवाची आणि आता 2014 पासून सशाची गती घेऊन 2024 पासून प्रकाशवर्षाची गती घेत खडकाप्रमाणे मजबूत होताना दिसत आहे……!

   परिणामी 700 दिवसापासून मणिपूर जळत आहे…….

       अल्पसंख्यांकांना टार्गेट करुन कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचे प्रयत्न चालविले जात आहेत……

   धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करुन एकमेकातील माणुसकीचा सलोखा संपवीला जात आहे……..

   विनाकारण इतिहासाची मोडतोड करण्याची भाषा बोलली जाते आणि त्यावरून शांतता भंग केली जाते…..

    साहजिकच पोलीस प्रशासनावर अतिरिक्त भार आल्यामुळे देशात केवळ बंदुकीचे राज्य निर्माण झाले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे…,.

        याचे मुख्य कारण एकच आहे की आम्ही ( भारतीय जनता ) आपापल्या महापुरुष आणि आदर्शाना अर्थात त्यांच्या विचार आणि आचारांना डोळसपणे न स्वीकारता, आंधळ्याप्रमाणे स्वीकारून त्यांना आमच्या जातीत, स्मारकात, पुतळ्यात, प्रतिमेत आणि ग्रंथात बंदिस्त करुन त्यांच्या क्रांतीचा स्वार्थासाठी लाभ घेऊन त्यांच्या वैश्विक मानवतावादी क्रांतिकडे मुद्दाम आम्ही दुर्लक्ष केले. म्हणून ही अवस्था आमची व देशाची निर्माण झाली आहे……!

 म्हणून या देशात संविधान राहिलेले नाही…….

या देशात लोकशाही राहिलेली नाही……

या देशात संविधाननिष्ठता राहिलेली नाही………

 म्हणून या देशात भारतीय नागरिक राहिलेले नाहीत…..!

  मग या देशात कोणती माणसं राहतात……?

  या देशात वेगवेगळ्या धर्माचे अनुयायी राहतात……

 या देशात प्रत्येक जातीची माणसे राहतात……..

या देशात प्रत्येक पंथाची लोकं राहतात.

     परंतू , आम्ही मात्र…..

 “आम्ही भारताचे लोक “

 केवळ उद्देशीकेत आहे म्हणून म्हणतो. वास्तवात मात्र जाती – जातीच्या डबक्यातच बेडकाप्रमाणे उड्या मारण्यात असुरी आनंद घेतो.

     हे असे अवघ्या 75 वर्षात का घडले……?

    या प्रश्नाचा विचार कुणीतरी केलाय……?

  होय या प्रश्नाचा विचार आणि धोक्याचा इशारा सुद्धा याच संविधान निर्मात्याने आम्हाला ( सर्वसामान्य भारतीय जनतेला ) दिलेला होता. तोही 75 वर्षापूर्वी.

         “येत्या 26 जानेवारी 1950 रोजी आमचा देश एका स्वतंत्र अशा देशात प्रवेश करेन. आमचा देश पूर्वी कधीच स्वतंत्र नव्हता असं नाही. परंतू , ते स्वातंत्र्य आम्ही का गमावून बसलो….? याचा विचार आम्ही केलाच पाहिजे. त्याचबरोबर 26 जानेवारी 1950 नंतर आमच्या देशाला संविधान निर्मितीतून मिळणारे स्वातंत्र्य जर आम्ही गमावून बसलो, तर ते स्वातंत्र्य पुन्हा आम्ही कधीही मिळवू शकणार नाही. या केवळ कल्पनेनेच माझे काळीज चर्रर्रर्र होत आहे.”

डॉ.बाबासाहेब आंबेडकर (25 नोव्हेंबर 1949 चे संविधान सभेतील तिसरे आणि शेवटचे भाषण)

                 कारण याच महामानवाने…….

    देशाला संविधानरुपी संसदीय लोकशाही अर्पण केली…… 

     त्याचबरोबर हे संविधान आणि लोकशाही कायमचे या देशात केवळ टिकवून ठेवण्यासाठीच नव्हे तर ती वृद्धिंगत ठेवण्याची जबाबदारी आमच्यावर (भारतीय जनतेवर) उद्देशीकेच्या आवाहनातून टाकली होती.

    त्यासाठी त्यांनी आम्हाला इशारा सुद्धा दिला होता की, सार्वजनिक सदसदविवेकबुद्धी विकसित केल्याशिवाय आमच्या देशात लोकशाही नांदणार नाही. त्याचप्रमाणे घटनात्मक नितीचे पालन केल्याशिवाय आमच्या देशात लोकशाही अविष्कारीत होणार नाही.या ईशाऱ्या नुसार आज 2025 च्या काळात……..

     घटनात्मक नीती आणि सदसदविवेक बुद्धी विकसित आणि अविष्कारीत होऊ शकली नाही…..

        म्हणून आमच्या देशातून लोकशाही आणि संविधान केवळ वरची आवरण उरली आहेत….!

      याला जबाबदार कोण……?

   याला जबाबदार केवळ मी आणि मीच ( प्रत्येक भारतीय नागरिक ) आहे……!

   कारण मी त्या मानवतावादी महामानवाला अजूनही जातीच्या, धर्माच्या चष्म्यातून 2025 च्या काळात सुद्धा पाहतो………

     म्हणून मी या व्यवस्थेचा गुलाम बनलो आहे…….!

   या गुलामीचा गर्व माझ्यात करकचून भरल्यामुळे, मला गुलामीची जाणीव होणार नाही. आणि मी त्या गुलामीविरुद्ध बंड करुन कधीही उठणार नाही. जणूकाही मी शपथ खाल्यासारखे राहून जगता – जगता मरत आहोत आणि मरता – मरता जगत आहोत. हेच वास्तव माझ्या जीवनाचे आहे.

     या गुलामीत जगणारा मी नाही………

   तुम्ही……….??????

  या देशातील वरील सर्व समस्येच्या मुळाशी केवळ आणि केवळ आमच्या मताचा मूलभूत हक्क हिरावून घेणारी EVM हीच आहे. जीला जगाने लाथाडले…..!

आवाहनकर्ता आणि जागृतीचा कृतिशील लेखक

           अनंत केरबाजी भवरे

 संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689