कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी : – तालुक्यातील आमडी फाटा कडुन पारशिवनी कडे कोळसा भरून जाणाऱ्या ट्रकने नयाकुंड कॅनाल चौकी ढाबा जवळ दुचाकीला धडक दिल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा किरकोळ जख्मी झाला असल्याची दुःख दायक घटना घडली.
शेतातील काम आटोपुन मुलगा व वडील दुचाकीने नयाकुड येथे घरी परत येत असताना मौजा नयाकुड शिवार येथिल कॅनाल चौकी जवळ साई ढाबा समोर कोळसा ट्रकने दुचाकीला जोरदार धडक मारल्याने दुचाकीवर मागे स्वार अशोक अवस्थी हे ट्रकच्या चाकात आल्याने घटनास्थळीच त्यांचा मुत्यु झाला तर मुलगा किरकोळ जख्मी झाला.
आज दुपारी २.४५ वाजता दरम्यान नयाकुंड येथील
फिर्यादी सुमित अवस्थी व त्याचे वडिल नामे अशोक रामदयाल अवस्थी हे आपली होंडा शाईन मो.सा. क्र. MH-40-CT-1982 ने आपले शेतात गेलो होते.शेतातील काम करून नयाकुंड येथे परत येण्यासाठी वडील बाईकवर मागे बसले होते.तेवढ्यात कोळसा ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघात घटनेनंतर ट्रक.क्र.MH-40-BL-2316 चा चालक पळुन गेला.फिर्यादी सुमीत अवस्थी रोडचे बाजुला पडला व त्याचे वडिल रोडवर पडले व त्याचे कमरेवरून ट्रक गेला. ट्रक चालक हा आपले ताब्यातील वाहण भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवीत होता असे फिर्यादी सुमित अशोक अवस्थीचे म्हणने आहे.
फिर्यादी सुमित अशोक अवस्थीचे तोंडी रिपोर्ट वरून व वैद्यकीय अहवालावरुन तसेच मा.पो.नी. सा. यांचे आदेशाने अपराध क्रमांक. 74/2023 कलम 279, 337, 304 (अ) भादवी सह कलम 184, 134 मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पारशिवनी पोलिस करित आहेत.