निरा नरसिंहपुर दिनांक: 19
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील प्रगतशील बागायतदार हारीदास वाळेकर, नवनाथ वाळेकर, आशोक वाळेकर यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष फत्तेसिंह व्यंकटराव मानेपाटील यांची सदिच्छा भेट झाली.
भेटी गाठी गप्पा मारत जुन्या गोष्टींना उजाळा,,तर शेतकऱ्यांची आडचण समजून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (दादांच्या) प्रयत्नाने गणेशवाडी येथील भीमा नदीवरील मोठा पूल झाला.फक्तसिंह माने पाटील यांचे यावेळी उद्गागार,, तसेच पैलवान पेशातील अंतर्गत गप्पा रंगल्या,, जुन्या आठवणीतील कुस्ती सम्राट कैलासवासी चांगदेव वाळेकर ,,कैलासवासी गजानन बोडके, यांची यावेळी फक्तसिंह माने पाटील यांनी आठवणी काढत चांगल्याच गप्पा रंगत जमल्या यावेळी वाळेकर परिवाराच्या वतीने, हारीदास वाळेकर, आशोक वाळेकर, नवनाथ वाळेकर, यांच्या वतीने फत्तेसिंह माने पाटील यांचा फेटा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सन्मान स्वीकारल्या नंतर फत्तेसिंह माने पाटील बोलत आसताना म्हणाले की, वाळेकर व सुतार कुटुंबावर नेहमीच आमचे प्रेम आणि विश्वास व आपुलकीचं नात आहे याचा विसर कधीच आम्ही पडू देणार नाही.
पिंपरी बुद्रुक येथील बाळासाहेब शेख यांच्या मुलाच्या लग्न समारंभा निमित्त फत्तेसिंह माने पाटील आले आसता वाळेकर व सुतार परिवाराला सदिच्छा भेट दिली.
यावेळी हारीदास वाळेकर,माजी सरपंच आबासाहेब बोडके, आशोक वाळेकर, नवनाथ वाळेकर, चंद्रकांत सुतार, हानुमंत पडळकर, बाळासाहेब सुतार,अनिल मोहिते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.