तालुका प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी
दखल न्यूज भारत
चंद्रपुर – जिल्ह्याच्या सिंदेवाही शहरातील मुख्य मार्गवारिल शिवाजी चौक येथील बाबू पोल्ट्री सप्लायर येथे रात्री च्या सुमारास बिबट्याने पोल्ट्री फार्म मध्ये घुसुन शेकडो बॉयलर कोबड्या ठार केल्याची घटना समोर आली आहे यामध्ये बाबु पोल्ट्री सप्लायर सिंदेवाही या पोल्ट्री व्यवसायकाचा लाखो रुपयाची नुकसान झाली आहे.
सिंदेवाही शहराच्या आजुबाजूला जंगल असल्यामुळे येथे नेहमीच जंगलातील पट्टेदार वाघ,अस्वल,बिबट हे जंगली वन्यप्राणी येत असल्याने नागरिकांमध्ये नेहमीच भीतीचे वातावरण असते रात्रीला पोलीसांना पण गस्त करावी लागते त्यांनापन जीवाची भीती असते.या आधी पन मॉर्निंग वाक ला जाणाऱ्या एका इसमाला आस्वल ने जखमी केले होते.
तर काल याच परिसरात वाघाने एका गोट्यात घुसुन एका बैलाला ठार केले.ही घटना ताजी असतानाच आज बिबट वाघाने चक्क पोल्ट्री फार्म मध्ये घुसुन शेकडो कोंबड्या फस्त करत ठार केल्या असुन शहरात आता जंगलातील वन्यप्राणी येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.