नागपूर विभागीय प्रतिनिधी
ऋग्वेद येवले
साकोली -कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)भंडारा अंतर्गत कृषी महोत्सव भंडारा कार्यक्रमाला उपस्थित गायधने सर आत्मा कृषी विभाग, पाटील मॅडम कृषी विभाग ,कोठांगले सर कृषी विभाग ,धकाते सर वैशाली देशमुख कुषी विभाग साकोली उपस्थित होते. सेंद्रिय जैविक शेती विषयावर मार्गदर्शन करताना अनिल किरणापुरे युवा शेतकरी यांनी सांगितले की,आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांचा जाती नष्ट होऊ लागल्या. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. या सर्वांना सक्षम पर्याय म्हणून पर्यावरण पूरक सेंद्रिय शेतीचा पर्याय पुढे येत आहे. पीक लागवड करण्याआधी त्या पिकाची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे भविष्यात शेती टिकवण्यासाठी सेंद्रिय शेतीची गरज आहे पुढच्या पिढीला विषमुक्त अन्न देण्यासाठी आपण सेंद्रिय शेती करणे अत्यंत गरजेचे आहे शेती करताना तिच्याकडे व्यावसायिक , चिकित्सक दृष्टीने बघितलं पाहिजे शेतात नवनवीन प्रयोग केली पाहिजे,
सेंद्रिय शेती ही एक निसर्ग-पूरक स्वयंपूर्ण शेती प्रणाली आहे जी स्थानिक संसाधनांचा वापर करते, कमी भांडवली खर्चाच्या तत्त्वावर आधारित, सेंद्रिय पदार्थांच्या योग्य वापराद्वारे जमिनीची उत्पादकता आणि शाश्वतता वाढवणे, जैवविविधता जोपासणे, आणि पोषण आणि इतर गोष्टींची पूर्तता करणे यावर लक्ष केंद्रित करते.
सेंद्रिय शेती अधिक फायदेशीर होण्यासाठी, शेतीतील आवश्यक घटक म्हणजे माती, पाणी, हवा यांचा अधिक प्रभावीपणे विचार करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे सेंद्रिय शेतीतील माहिती दिली.