दिनेश कुऱ्हाडे
प्रतीनिधी
आळंदी : शालेय शिक्षणाबरोबरच संत विचाराच्या अध्यात्माची ओळख व गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या विशेष सहकार्याने संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतील ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना वर्षभरापूर्वी सुरू केलेला ओळख ज्ञानेश्वरीची या उपक्रमाची सुरुवात झाली, शालेय अभ्यासक्रमाबरोबरच संत विचारांचा अभ्यास देणाऱ्या या आध्यात्मिक आळंदी पॅटर्न आळंदी आणि पंचक्रोशीतील तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक संस्था येत्या जुन महिन्यांपासून राबविणार आहे. या ओळख ज्ञानेश्वरी चे संस्कारक्षम उपक्रमाचे पालकत्व आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी घेणार आहे. यासाठी लागणारे सर्व साहित्य, अध्यापक संस्थान कमिटीच्या वतीने पुरविण्यात येणार आहे. तसेच शासकीय शाळेत सुध्दा हा उपक्रम राबविला जावा यासाठी पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद यांची संयुक्त बैठक बोलावली जाईल यामार्फत ओळख ज्ञानेश्वरी ची संस्कारक्षम उपक्रम हा आळंदी पॅटर्न राबविण्यासाठी आवाहन करणार आहोत असे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई आणि विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने ओळख ज्ञानेश्वरी ची संस्कारक्षम उपक्रम अनेक शैक्षणिक संस्थांनमध्ये राबविण्यासाठी एक संयुक्त बैठक झाली यावेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे पाटील, चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, सचिव अजित वडगावकर, तुकाराम गुजर, शिवाजी खांडेकर, ॲड.विष्णू तापकीर, दिपक मुंगसे, सुर्यकांत मुंगसे, उमेश महाराज बागडे, श्रीधर घुंडरे, प्राजक्ता हरपळे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर तसेच विविध शैक्षणिक संस्थेचे प्रतिनिधी, चरित्र समितीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.