युवराज डोंगरे
अमरावती(जिल्हा प्रतिनिधी)
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने स्मशानभूमीत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 19 मार्चला उघडकीस आली.
राम उर्फ अभंग गजानन चोरे वय वर्ष 22 रा येवदा या युवकाने दि .18 मार्चला रात्रीचे सुमारास येवदा येथील स्मशान भूमीमध्ये निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली, ही बाब दि.19 ला सकाळी नागरिकांच्या निदर्शनात येताच याबाबतची माहीती येवदा पोलिसांना देण्यात आली.सदर युवक अतिशय मनमिळावू व मेहनती असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे . त्याची घरची परिस्थिती अतिशय नाजूक असून तो मोल मजुरी करीत होता,तो अल्पभूधारक शेतकरी असुन त्याच्यावर महाराष्ट्र बँकेचे कर्ज असल्याची माहीती समोर आली असून त्याच्याकडे दोन एकर शेती असून त्यावर तो उदरनिर्वाह करीत होता. सततची नापिकी व डोक्यावरील कर्ज कसे फेडावे याच विवंचनेतून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याच्यामागे आई-वडील भाऊ असा आप्त परिवार आहे, घटनास्थळी पोलीस दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय,दर्यापूर येथे पाठविण्यात आला पुढील तपास येवदा ठाणेदार आशीष चेचरे यांच्या मार्गदर्शनात येवदा पोलीस करीत आहेत.