वाशिम जिल्हा
प्रतिनिधी
वाशिम:- अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अंतर्गत दि.१८/०३/२०२३ रोजी श्री.किसनलाल नथमल गोयनका कला व वाणिज्य महाविद्यालय,कारंजा अंतर्गत ग्राम इंझा येथे एनएसएस कॅम्प त्यामध्ये युवकांसोबत नेतृत्व बांधणी आणि संविधानिक मूल्य याबाबत एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेमध्ये अनुभव शिक्षा केंद्राच्या मूल्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यामध्ये अनुभव शिक्षकेंद्राचे
धर्मनिरिक्षता,सामाजिक न्याय,स्त्री पुरुष समानता,प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व,श्रमप्रतिष्ठा,पर्यावरण या मूल्याबाबत युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.अनुभव शिक्षा केंद्रा अंतर्गत होणाऱ्या विविध उपक्रमाबाबत आणि युवा राज्यस्तरीय अभ्यासक्रमाबाबत अनुभव कट्ट्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.स्त्री पुरुष समानता या विषयी तसेच चळवळीचे गीताच्या माध्यमातून युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शक म्हणून अनुभव शिक्षा केंद्र अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक मा.आशिष धोंगडे उपस्थित होते.या कार्यशाळेचे अध्यक्ष मा.रघुवंशी सर प्रमुख उपस्थिती मा. शिरसाट सर उपस्थित होते.तसेच NSS कॅम्प अधिकारी मा.राठोड सर व श्री.किसनलाल नथमल गोयनका कला व वाणिज्य महाविद्यालय कारंजा येथील शिक्षक वृंद या कार्यशाळेमध्ये उपस्थित होते.अशाप्रकारे हा उद्बोधन कार्यक्रम संपन्न झाला…