प्रमोद राऊत
तालुका प्रतिनिधी
चिमूर तालुका कुणबी समाज महिला संघटनेचे वतीने गुरुदेव सांस्कृतिक सभागृह वडाळा (पैकु) चिमूर येथे महिला दिनाचे औचीत्य साधून महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा योगिता लांडगे, उदघाटिका अपर्णाताई कीर्तिकुमार भांगडिया, प्रमुख पाहुण्या मेघाताई भांगडिया, छायाताई कंचर्लावार यांचे उपस्थितीत झाला.
मान्यवर अतिथीनी आपले मार्गदर्शनपर भाषणात महिलांनी कार्यक्रम आयोजित करून महिलांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी पुढे येऊन करावे असे संबोधित केले.
कार्यक्रमाचे संचालन हर्षा वैद्य, प्रास्ताविक गीताताई ठाकरे यांनी केले. उपस्थितांचे आभार यामिनी कोल्हे यांनी मानले. यावेळी रांगोळी स्पर्धा, गीत गायन, एकल नृत्य, समूह नृत्य तसेच विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्यात. स्पर्धेचे परीक्षणाचे काम अर्चना भोयर, हिवरकर, लीना भुसारी, बाळबुधे यांनी सांभाळले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता धनश्री यावले, नीता लांडगे, सविता वडस्कर, रंजना मिलमिले, सुनिता करारे, अरुणा उरकुडे, जिचकार, सराईतकर, धोटे, ढाकूनकर, दातारकर, बडकी, माधुरी ढोरे, राणी यांनी अथक परिश्रम घेतले.