प्रमोद राऊत
तालुका प्रतिनिधी
खडसंगी येथे माँ माणिका देवी सभागृहासाठी मागील झालेल्या कार्यक्रमात खडसंगी चे माजी उपसरपंच प्रमोद श्रीरामे यांनी आमदार बंटी भांगडिया याच्याकडे प्रस्ताव दिला होता. यावेळी आमदार बंटी भांगडिया यांनी पदाधिकारी व ग्रामवासियांना शब्द दिला होता. तो दिलेला शब्द जपत अल्पावधीतच आमदार भांगडिया यांनी खडसंगी येथील माँ माणिका देवी सभागृह करिता 2 कोटीचा निधी खेचून आणला.
राज्यातील गावाअंतर्गत मूलभूत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत अनेक लोकप्रतिनिधी कडून प्रस्ताव शासनाकडे प्राप्त होत असतात. त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावाअंतर्गत मूलभूत सुविधांच्या कामासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. आर्थिक वर्षातील तरतुदीतून जोडलेल्या अनुसूची प्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील खडसंगी, शंकरपूर, मासळ या गावासाठी माँ माणिका देवी सभागृहकरिता प्रत्येकी 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.
सदर 2 कोटी रुपयाच्या कामात सभागृह बांधकाम करणे 1 कोटी रुपये, सभागृह परिसराचे सौंदर्यीकरण करणे 50 लक्ष रुपये व सभागृह परिसरात सोयीसुविधा निर्माण करणे 50 लक्ष रुपये असे 2 कोटी रुपये एका सभागृह करिता चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात असे खडसंगी, मासळ, शंकरपूर असे तीन ठिकाणी माँ माणिका देवी सभागृह करिता आमदार बंटी भांगडिया यांनी निधी मंजूर करून आपल्या विधानसभा क्षेत्राकरिता आणून प्रशासकीय मान्यता सुध्दा मिळवून दिली याबद्दल खडसंगी येथील समस्त ग्रामवासियांकडून आमदार बंटी भांगडिया यांचे खूप खूप अभिनंदन केले.
यावेळी खडसंगी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच प्रमोद श्रीरामे, राकेश जीवतोडे, प्रभाकर दोडके, आकाश श्रीरामे, बंडू बारेकर, डॉ. दिपक दडमल, रोहीत जाभुळे, गिरिधर दडमल, शुभम श्रीरामे, अनिकेत घरत, मिथून झाडे, वेनुदास बारेकर, सुनील गडमारे, अरुण वाकडे, पंढरी श्रीरामे, डॉ चौखे, धनराज घरत, सूर्यभान श्रीरामे, आदी माना समाज बांधव उपस्थित होते