कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:- तालुक्यातील पोलीस ठाणे कन्हान हद्दी अंतर्गत नगर परिषदचे मागे राहणारा इसम नामे गोविंद रामदिन यादव वय 55 वर्ष हा अवैध रित्या एक लोखंडी गुप्ती बाळगत असल्याच्या माहिती वरून दोन पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता त्याचे जवळून एक लोखंडी गुप्ती अवैध रित्या मिळून आल्याने पंचनामा करून जप्त करण्यात आली व गुन्हा दाखल करुन सदर इसमास अटक करण्यात आली.
कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री.विशाल आनंद साहेब,अपर पोलीस अधीक्षक श्री.संदीप पखाले साहेब,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मुखतार बागबान व वरिष्ठ पो. नि.आर. ए. मानकर यांचे नेतृत्वात डी.बी.पथकातील सपोनि सतीश मेश्राम,कर्मचारी पोहवा मुदस्सर जमाल,पो.शि. वैभव बोरपल्ले,पोशि नवीन पाटील,चालक संदीप गेडाम यांनी केली.