सिनेअभिनेता देवेंद्र दोडके “कलारत्न”पुरस्काराने सन्मानित…  — ‘देवमाणूस’ नाटकाचे साकोलीत आयोजन,हजारोंवर प्रेक्षक स्तब्ध… 

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली :- सुपरिचित सिनेस्टार देवेंद्र दोडके यांना मित्रांगण तर्फे कलारत्न २०२५ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मूळ भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि गत २५ वर्षापासून चंदेरी दुनियेत विसावलेले आणि आपल्या अभिनयाने प्रसिद्ध असलेले देवेंद्र दोडके हे साकोली येथे “देवमाणूस” या नाट्यप्रयोगासाठी ( मंगळ. १८ फेब्रु.) आलेले होते. 

          साकोली येथे तीन दिवसीय शंकरपटाचे निमित्त साधून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या मित्रांगण संस्थेतर्फे “देवमाणूस” या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.

          ग्रामीण भागातील एक कलावंत अख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या अभिनयाने शहरी कलाकाराच्या पुढे असतो हे देवेंद्र दोडके यांनी दाखवून दिले. हे ग्रामीण भागाचे वैभव आहे याची जाणीव ठेवून कलारत्न २०२५ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

          यावेळी मित्रांगण संस्थेचे संपूर्ण पदाधिकारी डॉ.नरेश कापगते, डॉ.अरुण झिंगरे, प्रशांत गुप्ता, शरद कापगते, डॉ. सुनील समरीत, दामोदर कापगते, छगन पुसतोडे, किशोर डोये, अँड. दिलीप कातोरे, रवी परशुरामकर, विजय दुबे, उमेश भुरे, ग्यानीराम गोबाडे, राम चाचेरे, जे. डी. मेश्राम, कुंदन वलके, डी.डी. वलथरे, तुळशीदास पटले, विनोद भेंडारकर, गणेश बोरकर, रवि भोंगाने आणि आशिष चेडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना कलारत्न २०२५ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

         यादरम्यान साकोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांचा मित्रांगण कडून होमगार्ड परेड मैदानावर स्वच्छता गृहाची तातडीने सोय केल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

          सदर देवमाणूस हे नाट्यप्रयोग १ हजारावर नाट्यरसिकांनी बघितले व शेवटी पर्यंत प्रेक्षकांनी स्तब्ध होऊन हृदय स्पर्शी झाले होते हे उल्लेखनीय.