लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयाच्या प्रांगणात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा… शिव संस्कृतीक कार्यक्रमाने प्रेक्षकांची विद्यार्थ्यांनी मने जिंकली…

 बाळासाहेब सुतार 

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

        पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे सालाबाद प्रमाणे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.

          हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन भागवत सुतार, भारतआपा बोडके ,शिवाजी बोडके, देवराव पडळकर, या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

           तसेच सर्व पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या हस्ते ही राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. राजमुद्रा ग्रुप प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व शिवप्रेमी शिवाजी महाराजांचे मावळे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सवा निमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणाला वाव मिळण्यासाठी शिव संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

           या कार्यक्रमांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी गाण्यांमध्ये भाग घेऊन आपली संगीत गाण्याद्वारे प्रेक्षकांच्या समवेत नाचत गाजत कला दाखवण्यात आली. पिंपरी पंचक्रोशीतील आलेल्या प्रेक्षकांची व पालकांची आपल्या पाल्याने मने जिंकली. 

         महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.

           त्या निमित्ताने लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध संगीत गाण्या मध्ये भाग घेऊन आयोजन करण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

          शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर भाषणे, गीत, पोवाडे, नृत्य सादर करून त्यामध्ये महाराजांच्या शौर्याचे आणि त्यांचे आदर्श गुणांचे वर्णन केले. 

      तसेच संगीत गाण्याचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक व बक्षीस ग्रामस्थांच्या वतीने देऊन गौरविण्यात आले. 

       विद्यार्थ्यांना महाराजांच्या जीवन चरित्रातून प्रेरणा मिळते छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या देशाचे आदर्श आहेत त्यांच्याकडून आपण शौर्य, धैर्य आणि देशभक्ती हे गुण शिकायला हवेत.  

        या कार्यक्रमासाठी प्रमुख आयोजन राजमुद्रा ग्रुप प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि आजी-माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ शिवप्रेमी तरुण मित्र मंडळ पिंपरी बुद्रुक येथील शिवप्रेमी बहुसंख्येने कार्यक्रमा साठी उपस्थित होते.

         तसेच पहिल्यापासून ते शेवटपर्यंत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजमुद्रा ग्रुपचे कार्यकर्ते यांनी मानले.