जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या वतीने शिवजन्मोत्सव व संस्थेचा सातवा वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

        लाखेवाडी तालुका इंदापूर येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल , तसेच विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजन्मोत्सव व जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचा सातवा वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. 

         शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शिवमल्हार जहाज पथकाचे उद्घाटन, शिवाजी महाराजपालखी सोहळा, शिवप्रतिमा पूजन, शिवजन्माचा पाळणा, विद्यार्थी मनोगत, शिक्षक मनोगत, व मान्यवर मनोगत, शैक्षणिक वर्ष 2025 -26, प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ अशाप्रकारे कार्यक्रमाचे भव्य आयोजन केले होते.

           शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यात एका मराठा कुटुंबात झाला.भारताचा शूर असा सुपुत्र ज्याच्या शौर्याची कहाणी इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी नोंदवली गेली आशा शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी एक नवचैतन्य निर्माण करणारी पर्वणीच होय. 

            प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शिवराय म्हणजेच शिवाजी महाराज कोण होते त्यांचे चरित्र काय?त्यांचे विचार काय? रयतेचा राजा, लोक कल्याणकारी राजा म्हणून का ओळख आहे हे थोडक्यात सांगितले.

          इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर का शिवरायांनी राज्य केले याचेही उत्तम नमुने दिले. आपल्या पित्याने निर्माण केलेले राज्य दहापट वाढवणारे राजा म्हणजेच शिवराय अशा शिवरायांना घडवणाऱ्या माँ जिजाऊंच्या संस्कारांना ही स्पर्श करण्यात आला.

        छत्रपती शिवरायांच्या काळात कलम नव्हते, कागद नव्हते तरीसुद्धा प्रजा सुखी होती, कारण त्यांचा राजा शिवबा होता असे मार्मिक विचार ही सांगितले.

         शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शिवाजी वेशभूषा तसेच पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती,भगवा झेंडा, आकर्षक रांगोळी सडा, त्यामुळे सर्वच वातावरण शिवमय झाले होते.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्री.सम्राट खेडकर यांनी केले, त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी शिवाजी, जिजाऊ मावळे यांची बाह्य अंगाने वेशभूषा न करता विचार अंगीकृत करावे.

          संस्थेचे मुख्य सल्लागार श्री. प्रदीप गुरव साहेब यांनी विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारण्यासाठी कमीत कमी वर्षातून एकातरी किल्ल्याला भेट द्यावी.

          शिवाजी महाराजांची पाऊले ज्या किल्ल्याच्या मातीत उमटली ती माती कमीत कमी आपल्या कपाळाला तरी लावण्याचे परमभाग्य पदरात पाडून घ्यावे. असा मोलाचा सल्ला दिला. संस्थेच्या गरुडाच्या लोगो प्रमाणेच संस्थेची यशस्वी भरारी होत आहे असे गौरव उद्गार काढले तसेच सर्वांच्याच कल्याणासाठी ईश्वराकडे पै.वामनराव यांची विश्व प्रार्थना केली. 

          संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीमंत ढोले यांनी छत्रपती शिवाजी महाराज की, जय अशा शिवमय गर्जनेतून आपल्या भाषणाला सुरुवात केली, संस्थेचा सातवा वर्धापन दिन त्यानिमित्त संस्थेचा विकास आराखडा थोडक्यात सांगितला शिवाय सध्या परीक्षा वातावरणात बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेची 700 विद्यार्थ्यापासून ते 5000 विद्यार्थ्यांपर्यंतची यशस्वी कहानी थोडक्यात सांगितली, व सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा दिल्या.

          सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा ढोले, सचिव श्री. हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार श्री. प्रदीप गुरव , संस्थेचे विश्वस्त चि. पृथ्वीराज ढोले, चि. ऋषिकेश ढोले, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य श्री. गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य श्री. सम्राट खेडकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. श्रीमंत गुरव यांनी केले.