नेरी येथील बाजार चौकात शिवजयंती साजरी… — महिलांचे रक्षणकर्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज :- मायाताई नन्नावरे…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

         चिमूर तालुकातंर्गत मौजा नेरी येथे शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने बाजार चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

              या प्रसंगी भाजपा महिला आघाडी चिमूर तालुका अध्यक्ष मायाताई नन्नावरे यांनी शिवजयंती कार्यक्रमला उपस्थिती दर्शवीत छत्रपती शिवाजी महाराज राजे हे हिंदवी स्वराज्याचे जनक असून महिलांच्या सुरक्षितेचे खरे रक्षणकर्ते असल्याचे सांगत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

            याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच रेखा पिसे,ग्रामपंचायत सदस्य तथा नेरीचे युवा नेते निखिल पिसे,ग्रामपंचायत सदस्य पिंटू खाटीक,भाजपा नेते संदीप पिसे, संगिता कामडी,प्रज्ञा नागदेवते,आदीं उपस्थित होते.