
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर :- खामगाव बोथली तसेच सावरी येथील शेतकऱ्याने शेतावर येणाऱ्या जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी वनपरिक्षेत्र अधिकारी चिमूर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
चिमूर तालुक्यातील खानगाव हे गाव जंगलालगत असून नेहमी वन्य प्राणी फिरत असतात. शेतामध्ये हरभरा,गहू,ज्वारीही पिके असून जंगली जनावराच्या वास्तव्यामुळे व शेतातील उभी पिके कापण्यास शेतात मजूर काम करण्यास तयार नाही.
काही महिन्यापूर्वी अंकुश श्रावण खोब्रागडे या युवकाला वाघाने ठार केले होते. जंगलालगत १५ फूट जाळीचे कंपाऊंड तयार करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाला केली होती मात्र वनविभागाने अजूनही दखल घेतली गेली नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये अजूनही वाघाची दहशत कायम आहे.
खाणगाव या परिसरातील वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करून जंगलालगत १५ फूट तारेचे कुंपण वन विभागाने करून द्यावे यावे. मागणीचे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांना खामगाव,बोथली व सावरी येथील शेतकऱ्यांनी दिले.
यावेळी प्रमोद पाटील गौतम पाचभाई,रवींद्र चौखे,राजेंद्र रामटेके,रवींद्र शेंडे,लक्ष्मण पाटील,शंकर गजभीये उपस्थित होते.