टायगर ग्रुप चिमूर तर्फे शिवजयंती साजरी…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

           टायगर ग्रुप चिमूरच्या वतीने दिव्यवंदना आधार फाउंडेशन जामगाव (कोमटी) पोस्ट भिसी ता.चिमूर जिल्हा चंद्रपूर, मनोरुग्ण, बेवारस, भिक्षेकरी, किराणा वाटप करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

         टायगर ग्रुप चिमूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने डीजे संस्कृतीला बाजूला ठेवून शिवरायांच्या विचारांना अनुसरून अगदी साध्या पद्धतीने शिवरायांची जयंती साजरी केली.

          शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिव्यवंदना आधार फाउंडेशन अध्यक्ष शुभम पसारकर होते, टायगर ग्रुप तालुकाध्यक्ष चिमूर रोहन नन्नावरे अतिथी म्हणून उपस्थित होते.

          यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

         टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव, टायगर ग्रुप राष्ट्रीय उपाध्यक्ष भैय्यासाहेब बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.

         कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पवन डोंगरवार,कुणाल खिरटकर, सौरभ चटपकार, शुभम मुंढरे, देवेंद्र वरखडे, समीर झाडे, विशाल शिवरकर, पवन झाडे,आदींची उपस्थित होते‌.