
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- चिमूर तालुकातंर्गत मौजा सावरी बिडकर गट ग्रामपंचायत कार्यालयात इतिहासाच्या पानावर,रयतेच्या मनावर,मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच लोकनाथ रामटेके, ग्रामपंचायत उपसरपंच निखिल डोइजळ,ग्रामसेवक निखिल सहारे,ग्रामपंचायत सदस्य दिलीप खामनकर,दिलीप मोटघरे,आशिष घानोडे,संगणक परिचालक सुरेश मेश्राम,शिपाई दिलीप डांगे,ग्रामपंचायत सदस्या सुरेखा शेंबेकर,अर्चना हनवते,आदीं उपस्थित होते.