
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मासळ टी पॉईंट वर छत्रपतींच्या पुतळ्यास माल्यार्पण करून जय घोष करीत शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी मासळ येथील भाजप नेते असिफ शेख यांनी विचार व्यक्त करीत असतांना छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असल्याचे मत मांडले.
याप्रसंगी मासळ ग्रामपंचायत सरपंच विकास धारणे,किशोर येळमे,विनोद मोडक,माजी सरपंच नितेश गणवीर,क्रिष्णा कानझोडे,मोरेश्वर शेडामे,नाना वासे,राजू सूर,अमय राजूरकर,आदीं उपस्थित होते.