छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त काँग्रेसतर्फे पाणपोईचे उदघाटन व लाडू वाटप… 

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

घुग्घूस : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणते राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त 19 फेब्रुवारी रोजी शहर काँग्रेस तर्फे शहर अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने पानपोईचे उदघाटन व लाडू वाटप कार्यक्रम घेण्यात आले.

         घुग्घूस शहरात उन्हाचा प्रचंड तडाका वाढला आहे. शाळेकरी विद्यार्थी, प्रवासी,शेतमजूर व कामगारांना थंड पाण्यासाठी महागाडी पाणी बॉटल नाईलाजाने विकत घ्यावी लागत आहे.

         नागरिकांनी पाण्यासाठी त्रस्त होऊ नये याकरिता सदर पाणी पोईचे आयोजन करण्यात आले.

        एका चिमुकल्या मुलींच्या हस्ते लाल रिबन कट करून उदघाटन करण्यात आले.

           याप्रसंगी शिवप्रेमी नागरिक शिवाजी महाराज जयंती उत्सव व युवा बजरंग क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. शामरावजी बोबडे,काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दिलीप पिट्टलवार, अनिरुद्ध आवळे,महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, महिला कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के, सुजाता सोनटक्के, मंगला बुरांडे, निलिमा वाघमारे,मोसीम शेख, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख,तालुका सचिव विशाल मादर,तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, विजय माटला, एन. एस. यु. आय अध्यक्ष आकाश चिलका,बालकिशन कुळसंगे, देव भंडारी, सामाजिक कार्यकर्ते पंकज धोटे अभिष गोहोकार, दिपक पेंदोर,सुनील पाटील,रोहित डाकूर, नुरूल सिद्दीकी,दिपक कांबळे, गजानन नागोसे,कपिल गोगला, संजय कोवे, रंजित राखुंडे, अंकुश सपाटे, निखिल पुनगंटी,आयुष आवळे,साहिल आवळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.