
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. त्यानिमित्ताने विद्यालयात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे ज्येष्ठ प्रा.के. जी.लोथे , प्राध्यापिका स्वाती गहाणे व इतर मान्यवरांनी केले.
विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर भाषणे, गीत, पोवाडे, नृत्य सादर करून त्यामध्ये महाराजांच्या शौर्याचे आणि त्यांचे आदर्श गुणांचे वर्णन केले.
शिवजयंतीचे औचित्य साधून विद्यालयात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
विद्यालयाचे ज्येष्ठ प्रा. के.जी.लोथे यांनी विद्यार्थ्यांना महाराजांच्या जीवन चरित्रातून प्रेरणा घेण्याच्या संदेश दिला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या देशाचे आदर्श आहेत त्यांच्याकडून आपण शौर्य, धैर्य आणि देशभक्ती हे गुण शिकायला हवेत.
तसेच विद्यालयाचे प्राध्यापिका स्वाती गहाणे, डी.एस.बोरकर, के. एम. कापगते, एम.एम.कापगते यांनी सुद्धा आपल्या मनोगतातून महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमात प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन आर. व्ही. दिघोरे यांनी तर आभार प्रदर्शन सोनाली क-हाडे यांनी केले.