
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल (सीबीएसई) साकोली येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाकरीता अध्यक्ष प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान, प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, व सतिश गोटेफोडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन, माल्यार्पण करून करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.ब्रम्हानंद करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, सचिव सौ. वृंदताई करंजेकर व प्राचार्य सय्यद यांच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराज यांच्या वेशभुषेत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये पुर्व प्राथमिक च्या बहुतांश विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ तसेच मावळयांच्या वेशभुषा धारण करुन सहभाग दर्शविला.
कार्यक्रमाप्रसंगी जय शिवाजी जय भवानी, शिवाजी महाराज की जय तथा हर हर महादेव च्या जयघोषांनी संपुर्ण नवजीवन परीसर दुमदुमून गेला होता. नवजीवन सीबीएसईचे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शाहिरी, पोवाळे व लोकगीते सादर करून छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा दिला.
या कार्यकमाच्या यशस्वीतेकरिता नवजीवन सीबीएसईचे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बहुमोलाचे सहकार्य केले. कार्यकमाचे संचालन विन्नुश नेवारे तर आभार किशोर बावनकुळे यांनी केले.