चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
लाखनी:-
ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे गुरुकुल आयटिआय इथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ‘शिवाजीची पर्यावरण दृष्टी’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला त्याचबरोबर लाखनी नेचर पार्कवर स्वच्छता अभियान राबवून ,वृक्षारोपण तसेच वृक्षवाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गुरुकुल आयटीआय प्राचार्य खुशालचंद्र मेशराम,सेनि मुख्याध्यापक पुंडलिक वंजारी,लाखनी अभा अंनिसचे तालुका सचिव नामदेव कानेकर,ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी मंगल खांडेकर, अशोक नंदेश्वर,गुरुकुल आयटीआय संचालिका जयश्री मेशराम मॅडम हे उपस्थित होते.या कार्यक्रमाला नेफडो जिल्हा भंडारा तसेच अभा अंनिस तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडारा यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजनाने तसेच सर्व अतिथीचे स्वागत वृक्षरोपे देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच विस्तृतपणे मार्गदर्शन ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे
कार्यवाह व लाखनी नगरपंचायत ब्रँड अँबेसेडर प्रा.अशोक गायधने यांनी केले.त्यात त्यांनी ‘शिवाजीची पर्यावरण दृष्टी’ या विषयावर आधारित मार्गदर्शनामध्ये शिवाजीराजे यांचे वनराई,वृक्षारोपण, वृक्षकटाई, जल व्यवस्थापन, केरकचरा निर्मूलन, गडावरील स्वच्छता अभियान यासंबंधीचे धोरण विविध सोदाहरणे सादर करून विस्तृतपणे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाध्यक्ष नामदेव कानेकर, प्रमुख अतिथी पुंडलिक वंजारी यांनी सुध्दा शिवाजीच्या कार्यावर यथोचित प्रकाश टाकला.नामदेव कान्हेकर व सचिन पोहरकर यांनी शिवाजीवर आधारित काव्य व गीत टाळ्यांच्या गजरात सादर केले.
त्यानंतर गुरुकुल आयटीआय च्या विद्यार्थ्यांनी ग्रीनफ्रेंड्सने नेचर क्लबने लाखनी बसस्थानक येथे तयार केलेल्या नेचर पार्कवर स्वच्छता अभियान राबविले त्याचबरोबर वृक्षारोपण करून वृक्षवाटप सुद्धा करण्यात आले.अशाप्रकारे ग्रीनफ्रेंड्सद्वारे शिवाजीची जयंती पर्यावरणाचा कृतीपर संदेशाद्वारे पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन गुरुकुल आयटीआय निदेशक लाला सार्वे यांनी तर आभारप्रदर्शन गुरुकुल आयटीआय निदेशक सचिन पोहरकर यांने केले.
कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल संचालक डॉ मनोज आगलावे, श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ योगेश गिर्हेपुंजे, अशोका बिल्डकॉन पर्यवेक्षक अभियंता नितीश नागरीकर,सार्वजनिक बांधकाम अभियंता रजत अटकरे व ऋतुजा वंजारी,ग्रीनफ्रेंड्स अध्यक्ष अशोक वैद्य,ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे,से.नि.महसूल निरीक्षक गोपाल बोरकर,से.नि.प्राचार्य अशोक हलमारे,महाराष्ट्र प्लास्टिक सेंटरचे अनिल बावनकुळे, सेंद्रीय वनौषधी पुरस्कर्ते इंजि.राजेश गायधनी,नाना वाघाये,गुरुकुल आयटीआयचे विद्यार्थी बबली बारसागडे,अपेक्षा वैद्य, आकांक्षा श्यामकुवर, अंजली भालेराव, केशवी मेशराम, प्रांजल मेशराम, मयुर अतकारी,युगांत खोब्रागडे तसेच आयटीआय निदेशक कैलास डुंभरे, सुरेश गजापुरे,सविता झिंगरे व मानव सेवा मंडळाचे सदस्यांनी यांनी अथक प्रयत्न केले.