दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्त आज आळंदी नगरपरिषद व विविध संघटना यांच्या विद्यमानाने शासकीय छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. नगरपरिषदेचे सभागृहात मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आळंदी नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आळंदी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि त्यांचे पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शिवस्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने छत्रपती शिवराय पुष्पहार वंदन व जिजाऊ वंदना, शालेय विद्यार्थी व्याख्यान, पोवाडे, इ उपक्रम राबविण्यात आले.तसेच यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आळंदी भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास शिवचरित्र भेट देण्यात आले. आळंदी आणि पंचक्रोशीत सुध्दा शिवजयंती साजरी करण्यात आली.