दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये आज दिमाखदार वातावरणात शिवजयंती निमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा जयघोषात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शासन परिपत्रकानुसार (जय जय महाराष्ट्र माझा) या राज्य गीताचे गायन करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विश्वस्त प्रकाश काळे, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे सदस्य सोपान काळे, विलास वाघमारे, धनाजी काळे, विश्वंभर पाटील, प्राजक्ता हरपळे, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
यावेळी अजित वडगावकर, दीपक मुंगसे, श्रीधर घुंडरे, विद्यार्थी ज्ञानेश्वर डोंगरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र व्यक्त करताना महाराजांचे आचार – विचार फक्त ऐकण्यासाठी नसून ते आचरणात आणणे आवश्यक असल्याचे सांगितले. राजा कसा असावा अठरापगड जाती – धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन गोरगरीब, कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, जनसामान्य,भूमिपुत्रांचे स्वराज्य निर्माण करणारे, स्वराज्यातील रयतेवर आईच्या अंत:करणाने माया करणारे, प्रजावत्सल, लोककल्याणकारी, विज्ञानवादी, संवेदनशील मनाचे, सामान्य रयत आणि शेतकऱ्यांचे रक्षणकर्ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे नेतृत्व, कर्तृत्व, युद्ध कौशल्य आदी गुण, मूल्य व संस्कराविषयी विचार व्यक्त केले.