संपादकीय
दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे तर देशातील नागरिक नेहमी अस्थिर व्हावे व त्यांच्या मनात सातत्याने संभ्रमावस्था असावी,याच पध्दतीची कार्यपद्धत सध्या स्थित भारत देशात सुरू आहे.
देशातील नागरिक स्थिर झाले व शांत राहिले तर लोकसभा सार्वत्रिक निवडणुका अंतर्गत दिलेल्या आश्वासना बाबत केंद्राच्या व राज्याच्या सत्ता पक्षाला,महाराष्ट्र राज्यासह देशातील नागरिक जाब विचारणार व आश्वासनांतंर्गत कर्तव्य पार पाडा यासाठी आंदोलन करणार याची भिती केंद्र सरकारला आहे.
म्हणूनच देशात कुठल्याना कुठल्या घटनाक्रमातंर्गत देशातील नागरिकांना अस्थिर करून ठेवल्या जात आहे.याचबरोबर देशातील नागरिक नेहमी संभ्रमावस्थेत रहावे याचाच घाट हमेशा आखल्या जात असल्याची दाट शंका आहे.
देशातील शेतकऱ्यांना,विद्यार्थ्यांना, मजूरांना,सुशिक्षित बेरोजगारांना,गोरगरीब बांधवांना न पाळता येणारे वारेमाप खोटे आश्वासन देऊन भाजपा व मित्रपक्षांनी केंद्राची आणि इतर राज्यांची सत्ता हस्तगत केली.
दिलेल्या खोट्या आश्वासनाचे जोरदार प्रतिबिंब नागरिकांच्या,विद्यार्थ्यांच्या,मजूरांच्या,सुशिक्षित बेरोजगारांच्या आंदोलनातून उमटू नये व तीव्र आंदोलनातंर्गत भाजपाच्या विरोधात नागरिकांचे मने जाऊ नये याची खबरदारी केंद्र सरकार घेताना दिसते आहे.
म्हणूनच अंमलबजावणी करता न येणारे,”एक झाले की दुसरे आश्वासन,केंद्रीय सत्ता पुढे करताना दिसून येते आहे.याचबरोबर देशातंर्गत विविध प्रादेशिक-राष्ट्रीय पक्षांना तोडणे,त्यांना अस्थिर करणे,त्यांच्यात झगडे लावणे,यामाध्यमातून नागरिकांना म्हणजेच मतदारांना आपल्या अधिकार हक्काप्रती आणि कर्तव्याप्रती एक होऊ न देणे अशाच प्रकारचा घटनाक्रम घडतो आहे.
देशातील विविध प्रकारचे घटनाक्रम बारकाईने तपासले तर एकच लक्षात येते,येनकेन प्रकारे या देशातील नागरिकांचा,शेतकऱ्यांचा,विद्यार्थ्यांचा,मजूरांचा,गोरगरीबांचा, सर्वांगिण विकास होवू न देणे असेच दिसून येते आहे.
तद्वतच रस्त्याच्या व इतर मोठ्या कामांत भांडवलदारांचा विकास आहे.या देशातील नागरिकांचा नाही याची माहिती देशातील तमाम मतदारांना होवू नये याची दक्षता सुद्धा घेतली जात आहे.
मानसिक आणि वैचारिक गुलाम केल्याशिवाय देशातील नागरिकांना लाचार करता येत नाही,अशाच पध्दतीचा छडयंत्रकारी कट देशातील सत्तापक्षांद्वारे केला जातोय काय?याकडे देशातील नागरिकांनी बारकाईने बघने काळाची गरज आहे.