आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचे बक्षीस वितरण…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

           धानोरा येथे मागील पाच दिवसापासून मॉर्निंग क्रिकेट क्लब च्या वतीने क्रिकेट सामन्याचे आयोजन धानोरा तालुका क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आलेली होते.

           आज 18 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता क्रिकेट सामन्याचे बक्षीस वितरण आमदार डॉ मिलिंद नरोटे यांनी विजय संघांना क्रिकेट संघाला बक्षीस वितरण केले.

                महाकाली क्रिकेट क्लब औंधी यांना पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 33 हजार रुपये देण्यात आले तर दुसरे बक्षीस एमसीसी क्रिकेट क्लब मंडळ धानोरा यांना 21 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या हस्ते देण्यात आले.

           यावेळी क्रिकेट खेळून मनसोक्त आनंद लुटला यावेळी क्रिकेट खेळाडू तसेच सुभाष धाईत माजी नगरसेवक साजन गुंडावर युवा नेता सारंग साळवे शहर प्रमुख धानोरा नगरसेवक सुभाष खोबरे लंकेश माशाखेत्री नगरसेवक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

            तसेच वार्ड धानोरा येथील वार्ड क्रमांक दोन,तीन, चार ,13 ,10, 11 या प्रभागामध्ये पाण्याची समस्या असल्याने नागरिकाचे म्हणणे यावेळेस ऐकून घेतले व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.