नवजीवनच्या विद्यार्थ्यांची कराटे स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी…

 ऋग्वेद येवले

   उपसंपादक

 दखल न्यूज भारत

 साकोली :- नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल (सीबीएसई) येथील कराटे प्रशिक्षणार्थी यांनी प्राचार्य डॉ. प्रशांतो मुखर्जी, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान, सतिश गोटेफोडे व कराटे प्रशिक्षक श्रीधर खराबे यांच्या मार्गर्शनाखाली चरखागृह वर्धा येथे घेण्यात आलेल्या नॅशनल कराटे स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.

           या स्पर्धेमध्ये नवजीवन सीबीएसई च्या कराटे प्रशिक्षणार्थी यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून एकुन 12 सुवर्ण, रजत व कास्य पदक प्राप्त करून बेस्ट टीम ट्राफी चे मानकरी ठरले. विद्यार्थिनी अथक मेहनत करून तसेच नेत्रदीपक कामगिरी व उत्कृष्ट प्रदर्शन करीत नवजीवन (सीबीएसई) शाळेचे नाव उंचावून मानाचा तुरा रोवला.

           विजेत्या खेळाडूंमध्ये अर्शभ बडोले सम्यक वालदे, अनुष्का साखरे, वैधही खोटेले, खुशी पंधरे, येवनी उईके, सोनवी जांभुळकर यांचा सहभाग आहे.

        विजेत्या खेळाडूंना पुनःशच शाळेमध्ये पदक व प्रमाणपत्रांचे वितरण करून सर्व विद्यार्थ्यांचा गौरव, अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

         विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय कराटे प्रशिक्षक श्रीधर खराबे, आई वडील, प्राचार्य, प्रशासकीय अधिकारी, पर्यवेक्षिका, वरिष्ठ शिक्षिका, सतिश गोटेफोडे व समस्त शिक्षक वर्ग यांना दिले.

          सर्व नवजीवन चॅम्पियन्सचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्राह्मानंद करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, संस्था सचिव सौ.वृंदाताई करंजेकर व शैक्षणिक परिसरातील सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करुन पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.