
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
करोडो रुपयांच्या अवैध उत्खनन प्रकरणी कंत्राटदार सिध्दार्थ गुप्तांवर फौजदारी कारवाई करण्यासाठी तलाठी विनोद खोब्रागडे यांनी वरोरा न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे.सदर प्रकरणाची सुनावणी २२ जानेवारीला आहे.
वरोरा येथील पटवारी वरोरा विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे हे दिनांक १९/११/२०२१ रोजी चार ट्रक मालकावर अवैध उत्खनन प्रकरणी जप्तीची कारवाई केली होती व वरोरा पोलिस ठाण्यात FIR रजीष्टर केले होते.तद्वतच १ करोड १५ लाख ६० हजार रुपये दंडाची कारवाई करुन दाखविले होते.
वरील सदर प्रकरण लक्षात घेतले तर रेल्वेच्या ठेकेदार श्री.सिद्धार्थ गुप्ता यांनी शेकडो करोडो रुपयांचा राष्ट्रीय संपत्तीची लुटमार केली असताना त्यांच्यावर महसूल अधिकाऱ्यांनी २०२४ पासुन आजपर्यंत FIR रजीष्टर का केले नाही?हा महत्वपूर्ण प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे..
अखेर जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा जी सी व सहाय्यक जिल्हाधिकारी वरोरा श्री.जेनित चंद्रा व इतर ११ यांचा विरुद्ध फौजदारी खटला वरोरा न्यायालयात दाखल करताच SDO वरोरा यांनी रेल्वेच्या ठेकेदारावर दंडाच्या कारवाईचा आदेश तहसीलदार वरोरा यांचा कायम ठेवला आहे.
अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचाकडे ६० दिवसात अपील दाखल करु शकतात असे आदेशात नमुद केले,अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.म्हणजे पुन्हा तारीख पे तारीख आहे.
मात्र रेल्वेच्या ठेकेदार श्री.सिद्धार्थ गुप्ता यांच्या वर FIR रजीष्टर केलेला नाही,त्यामुळे जिल्हाधिकारी चंद्रपूर व सहाय्यक जिल्हाधिकारी वरोरा सह इतर अधिकारी यांच्या वर कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा हे दिनांक २२/०१/२०२५ ला काय आदेश करतात याकडे लक्ष लागलेले आहे.
मा.कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांचे,न्यायालयात आरोपी रेल्वेचे ठेकेदार श्री.सिध्दार्थ गुप्ता सह दोन IAS अधिकारी,व दोन IPS अधिकारी सह ११ आरोपी विरुद्ध फौजदारी पीटिशन मध्ये सुनावणी पुर्ण झाली,प्रकरण दिनांक २२/०१/२०२५ ला आदेशा करीता लागले आहे.
फिर्यादी – संघर्षी आयु. विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी तथा जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक यांनी जबरदस्त आर्गुमेंन्ट केले व वस्तुस्थिती समजावून सांगितले.पहिल्याच आर्गुमेंन्ट मध्ये प्रकरण आदेशाकरीता लागले आहे.
दिनांक १३/१२/२०२४ ला पीटिशन दाखल केली होती,व दिनांक १०/०१/२०२५ ला सुनावणी ठेवली होती,सुनावणी झाली व प्रकरण आदेशाकरीता लागले आहे.केस नंबर ३१२/२०२४ आहे…
सविस्तर असे की दिनांक १०/०१/२०२५ रोजी कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या न्यायालयात रेल्वेचा ठेकेदार आरोपी सिद्धार्थ गुप्ता,जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा जी सी,IAS अधिकारी,सहाय्यक जिल्हाधिकारी श्री.जेनित चंद्रा वरोरा IAS अधिकारी,मुमक्का सुदर्शन पोलिस अधीक्षक चंद्रपूर IPS अधिकारी,नयोमी दशरथ साठम साहाय्यक पोलीस अधीक्षक वरोरा IPS अधिकारी सह १२ आरोपी विरुद्ध फौजदारी खटला मध्ये सुनावणी झाली आहे.
वरिष्ठ महसूल अधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांना सुद्धा आरोपी करण्यात आले आहे..
मा.सुप्रीम न्यायालयाचे पाच न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश व इतर मध्ये,क्रिमीनल रिठा पीटीशन ६८/२००८ मध्ये महत्त्व पुर्ण निर्देश पोलिस प्रशासन यांना दिले होते,त्यांचे पोलिस प्रशासन यांनी जानीवपुर्वक उल्लंघन केले आहे, आदेश भंग केला आहे,म्हणून त्यांना सुद्धा आरोपी केले आहे.
आपल्या देशात कायद्याचे अर्थात भारतीय संविधानाचे राज्य आहे मनमानीचे नाही,(कायद्यापुढे सर्व समान आहेत),भारतीय संविधानातील अनुच्छेद १४ नुसार सर्व समान आहेत..
राष्ट्रीय संपत्तीची शेकडो,करोडो रुपयांची खुलेआम लुटमार होत असताना महसूल अधिकारी व पोलिस अधिकारी यांनी बघायची भुमिका घेतली होती, व आपल्या कर्तव्यात कसूर केले आहे,म्हणून त्यांना आरोपी केले आहे.
फिर्यादी:-संघर्षी आयु विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी तथा जबाबदार जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक यांनीच फौजदारी खटला दाखल केला,व स्व:ताच आर्गुमेंन्ट केले आहे.
अखेर,अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात,आरोपी वरोरा रेल्वेचे सहाय्यक अभियंता सिद्धार्थ गुप्ता,श्री.विनय गौडा जी सी जिल्हाधिकारी चंद्रपूर,श्री.जेनित चंद्रा सहाय्यक जिल्हाधिकारी वरोरा,श्री.योगेश कौटकर तहसीलदार वरोरा,श्री. उल्हास लोखंडे नायब तहसीलदार वरोरा,श्री.मधुकर काळे नायब तहसीलदार वरोरा,श्री.रंनजीत बरानपुरे मंडळ अधिकारी व तलाठी कवडु आत्राम व आखाडे लिपीक व ठाणेदार तांबळे वरोरा,उपविभागीय पोलिस अधिकारी साठम मॅडम वरोरा,पोलिस अधीक्षक चंद्रपूर मुम्मका सुदर्शन यांच्यावर फौजदारी कारवाई साठी वरोरा न्यायालयात फौजदारी पीटिशन दाखल केली होती.
दिनांक १०/०१/२०२५ रोजी त्यावर सुनावणी झाली आहे.प्रकरण दिनांक २२/०१/२०२५ ला आदेशाकरीता लागले आहे.यामुळे महसूल प्रशासन,व पोलिस प्रशासन मध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
आरोपी श्री.सिद्धार्थ गुप्ता यांनी मौजा डहाडा रिठा येथील सरकारी स.नंबर २४ क्षेत्र ४.२७ मधुन अवैध मुरुम उत्खनन करून मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्तीची लुटमार करीत असतांनाही,त्यांच्या गाड्या जप्त करुनही,महसूल अधिकारी यांनी,व पोलिस प्रशासन यांनी आजपर्यंत FIR दाखल का केले नाही?
दंडाची रक्कम सुद्धा एक करोड एक्कावन लाख रुपये आजपर्यंत वसुल केले नाही व आरोपी श्री.सिद्धार्थ गुप्ता यांच्या कडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार अप्रत्यक्ष करुन बचाव करन्याचा प्रर्यत्न केला आहे व आपल्या कर्तव्यात संबंधित अधिकाऱ्यांनी कसूर केले आहे.
अनेक न्युज पेपरला बातम्या प्रसिद्ध होऊनही महसूल अधिकारी,व पोलिस प्रशासन बघायची भुमिका घेतली होती,हे वास्तव आहे.
शेवटी विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक यांनी वरोरा पोलिस ठाण्यात गंभीर रिपोर्ट दिली त्यांनी सुद्धा कारवाई केली नाही.
अखेर वरोरा न्यायालयात फौजदारी पीटिशन दाखल केली..
राष्ट्रीय संपत्तीची लुटमार होत असेल तर ते वाचविने करीता भारतीय संविधानातील अनुच्छेद ५१ क.क.नुसार १ ते ११ चे पालन करणे प्रत्येक नागरिक यांचे कर्तव्य आहे..
रेल्वेच्या ठेकेदारावर FIR रजीष्टर महसूल अधिकारी व पोलिस अधिकारी यांनी का केले नाही?
*****
समाजहितासाठी,देशहितासाठी राष्ट्रबांधनीसाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी,संविधान संरक्षणासाठी सर्व समाज बांधवांनी जागृत राहावे… धन्यवाद!
*****
टिप:-कुटलीही पोष्ट शहानिशा केल्याशिवाय वायरल करु नका..राज्य नियमावली,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियम २०२३ कलम ३० पहा…
चंद्रपूर जिल्हा न्यायालय अंतर्गत बाब आहे…
******
जनहितार्थ जारी….
संघर्षी आयु विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी तथा जबाबदार जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी आणि संविधानाचे अभ्यासक,सामाजिक कार्यकर्ते,लोकसेवक,प्रकल्पग्रस्त शेतकरी,RTI कार्यकर्ते वरोरा, जिल्हा चंद्रपूर…