नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली : या आधुनिक काळात प्रत्येक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व आरोग्य विषयक सर्व सेवेचा लाभ घ्यावा तसेच दहावी नंतर आरोग्य शैक्षणिक शाखेत पदविका अभ्यासक्रम पूर्ण करीत रूग्णसेवा हिच देशसेवा हि प्राणप्रतिष्ठा करावी असे प्रतिपादन बालरोगतज्ज्ञ डॉ. नितीन गुप्ता यांनी ( ता.१९.जाने.) ला जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्र ०१ वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी केले.
गणेश वार्ड साकोली येथील केंद्र शाळेत उदघाटन प्रसंगी डॉ. नितीन गुप्ता, गटविकास अधिकारी के.डी. टेंभरे, अॅड. मनिष कापगते, प्रविण भांडारकर, दिपक हिवरे, हेमंत भारद्वाज, तुळशीराम भुरे, से.नि.उच्च श्रेणी मुख्याध्यापक रेवाराम तिडके, प्रा.अमित जगिया, प्रकाश कोवे, आशिष गुप्ता, किशोर बावणे, सोनू बैरागी, लीना चचाने, स्वप्निल गजभिये, सुनिल सुर्यवंशी, नरेश साखरे, ज्योती गजापूरे, कुंदा रामटेके, भारती बोरकर, भुमिता आगाशे व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते. हजर पाहुण्यांनी आपल्या विविध भाषणात स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कौशल्य, खेळोत्तेजनाला राष्ट्रीय स्तरांवर कशी चालना मिळेल हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. सांस्कृतिक कार्यक्रमात वर्ग ७ च्या मुलींनी महाराष्ट्रीयन संस्कृती वेषभूषेत महाराष्ट्र गौरव गीत व तुझं वंदू मोरया गीत सादर करून मान्यवरांनीही टाळ्यांचा गजर करत कौतुकाभिनंदन केले. तीन दिवस चालणाऱ्या या स्नेहसंमेलनात संचालन शिक्षक आर.आर. बांगळे, टि.आय. पटले करीत आहेत. या सर्व वार्षिक स्नेहसंमेलनात मुख्याध्यापक डि.डी. वलथरे, शिक्षक एम.व्ही. बोकडे, कार्तिक साखरे, आर.एल.बिसेन, यमंता वलथरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश कोवे, उपाध्यक्ष लिना चचाने, सदस्यगण आशिष चेडगे, अमित लांजेवार, सचिन डुंभरे, अजय कावळे, चित्रलेखा नंदेश्वर, वंदना रंगारी, सारिका कापगते, त्रिशिला जव्हेरी, छनूताई मडावी, रेश्मा कोवे, कविता बावणे, विद्यार्थी प्रतिनिधी आर्यन कोवे, मयूर निंबेकर, विद्यार्थीनी प्रतिनिधी डिम्पल कापगते, दिव्या आगाशे हे प्रयत्नशील आहेत.