शिवरा येथील सभागृहाचे काम निकृष्ट दर्जाचे…‌

  उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

        चिमूर तालुक्यातील मौजा शिवरा येथे ठक्कर बाबा योजनांतर्गत सभागृहाचे बांधकाम सुरु आहे.मात्र संबंधित ठेकेदार सभागृहाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करीत असल्याची ओरड स्थानिक नागरिकांची आहे.

            निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत,संबंधित अभियंता यांचे सोबत चर्चा करण्यासाठी दखल न्यूज भारत कार्यालयातून भ्रमणध्वनी द्वारे काॅल केला असता चुकीचा नंबर असल्याचे सांगण्यात आले.

               ठेकेदारांकडून शिवरा येथील सभागृहाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असताना संबंधित अभियंता शांत व चूप कसे काय आहेत हेच कळायला मार्ग नाही.

              शिवरा येथील सभागृहाचे होणारे निकृष्ट दर्जाचे बांधकाम कुणाच्या पथ्यावर पाडणार आहेत याचे उत्तर संबंधित बांधकाम ठेकेदारांकडे आणि संबंधित अभियंताकडे असणारच!

         मात्र,शिवरा येथील निकृष्ट दर्जाच्या सभागृह बांधकामाबाबत वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील काय?