दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे अंतर्गत इंग्रजी विषयामध्ये इयत्ता 6 वी साठी प्राथ. एलिमेंटरी, इयत्ता 7 वी साठी एलिमेंटरी, इयत्ता 8 वी साठी इंटरमिजिएट, इयत्ता 9 वी साठी ज्युनिअर व इयत्ता 10 वी साठी सिनियर या परीक्षा घेतल्या जातात. सदर परीक्षेमध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या परीक्षेसाठी एकूण 170 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यातील 160 विद्यार्थी उतिर्ण झाले असून सदर इंटरमिजिएट (इंग्रजी) परीक्षेत इयत्ता 8 वी तील अनिशा अरविंद शिंदे या विद्यार्थिनीने 87 गुण प्राप्त करून विद्यापीठात द्वितीय क्रमांक मिळविला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, विद्यार्थिनी अनिशा शिंदे, इंग्रजी विषय समिती प्रमुख हेमांगी उपरे, समन्वयक शिक्षिका मनीषा कुंजीर, सुजाता खैरे व इंग्रजी विषयाचे मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर, संस्था पदाधिकारी, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांनी कौतुक व अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.