उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर तालुक्यातंर्गत वाळू चोरीचा व्यवसाय जोरात सुरु असून या व्यवसायाकडे स्थानिक महसूल,पोलिस,आणि खनिकर्म विभाग सातत्याने दुर्लक्ष करतो आहे.
चिमूर तालुक्यातंर्गत वाळू चोरीच्या व्यवसायाकडे होणाऱ्या,”तिन्ही विभागाच्या दुर्लक्षामुळे,परिणामी अनेक निष्पाप तरुणांचे ट्रॅक्टरटाली मध्ये दबून मृत्यू झाले आहेत.
वाळू भरलेल्या ट्रॅक्टर टाली द्वारे अपघातातंर्गत गरिबांच्या मुलांच्या झालेल्या मृत्यूला,”ट्रॅक्टरटाली मालकाला व ट्रॅक्टर चालकाला जबाबदार धरून,”त्यांच्यावर वाळू चोरीचा व मनुष्यवधाचा गुन्हा चिमूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार व तहसीलदार चिमूर का म्हणून दाखल करीत नाही? हा प्रश्न अधिकच गडद होत चालला आहे.
या आधी खडसंगी परिसरात दोन युवकांचा मृत्यू वाळू भरलेल्या ट्रॅक्टरटाली द्वारे झालेला होता.ट्रॅक्टरटाली मालक मृतकाचे परिवाराला चिरीमिरी देऊन कदाचित चूप ठेवीत असतील,पण मृतक युवकांना जिवदान तहसीलदार आणि ठाणेदार देणार आहेत काय?हा मुद्दा समाजमनाला खूप वेदना देतो आहे.
काल सकाळी (पहाटे) दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोज मंगळवारला मौजा शिवणपायली येथील ट्रॅक्टर मालक सुमीत पालकदास बोरकर यांच्या ट्रॅक्टरटाली मध्ये वाळू भरून दुलाई करण्यासाठी मौजा शिवणपायली येथील १९ वर्षीय तरुण युवक कुमार लखन अंबादास पोईनकर गेला होता.(त्याच्या सोबतीला अजून मजूर व्यक्ती होते.)
सुमती पालकदास बोरकर यांचे ट्रॅक्टरटाली द्वारे काल अगदी सकाळीच वाळू भरून नेरीकडे जात असतानाच शिवणपायली ते चिखली या गावांच्या मध्ये कुमार लखन अंबादास पोईनकर ट्रॅक्टरटाली वरुन खाली पडला.तो पडल्यानंतर ट्रॅक्टर टालीच्या चक्याखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला.
असे असताना चिमूर पोलिस स्टेशन मध्ये वाळू चोरीचा व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही,याला काय म्हणावे? कालच्या अपघात प्रकरणातंर्गत कुमार लखन अंबादास पोईनकर या मृतक युवकांच्या कुटुंबियांना न्याय दिला जाणार की प्रकरण दाबल्या जाणार याबाबत साशंकता आहे.
चिमूर तालुक्यातंर्गत अवैध वाळू व्यवसायाच्या माध्यमातून अनेक युवकांचे जिव जात असताना तहसीलदार चिमूर व संबंधित ठाणेदार यांचे अवैध वाळू व्यवसायाकडे सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षाला काय म्हणावे?
चिमूर तालुक्यातंर्गत महसूल विभागासह पोलिस विभागाचे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने,त्यांचे या अवैध वाळू व्यवसायिकांसी साटेलोटे आहेत असे समजायचे काय?
तसे असेल तर वाळू चोरीला अनुसरून तहसीलदार श्रिधर राजमाने आणि चिमूर ठाणेदार यांच्यावर जिल्हाधिकारी चंद्रपूर,जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर मनुष्यवधाचा व वाळू चोरीचा गुन्हा दाखल करणार काय?हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.
चिमूर तहसीलदार आणि चिमूर व भिसी ठाणेदार वाळू चोरीला अनुसरून अजून किती बळी घेणार? हे गंभीरच नाही का?