सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही-येथे अल्पसंख्याक हक्क दिन संपन्न…

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधि

    सिंदेवाही

      विद्या प्रसारक संस्था द्वारा संचालित सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही येथे आज ( दि १८) अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या संगीता यादव मॅडम यांनी भूषविले. यावेळी नगरसेवक तथा समाज सेवक प्रा. युनुस शेख, प्राचार्य अतुल केकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

    उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी नगरसेवक तथा समाज सेवक युनुस शेख यांनी अल्पसंख्यांक हक्क दिनाचे महत्व विशद करताना घटनेने अल्पसंख्याक समुदायाला कोणते अधिकार दिले, का देण्यात आले, अल्पसंख्यांक कोणाला म्हणतात, देशात किती अल्पसंख्यांक आहेत याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. प्राचार्य केंकरे सर यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विलास धुळेवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील उके, चंद्रशेखर सलामे, विनय खोब्रागडे, संजय जोनामवर, कृष्ण ठिकरे, लिखित उज्वावकर, अश्विनी नागोशे, मंजुषा कुररेवार, जयश्री ज्ञानवडकर, वनिता कस्तूरवार यांनी सहकार्य केले.