कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :- श्री.केशवस्वामी देवस्थान पारशिवनी संस्थानच्या वतीने दिनांक 9 डिसेंबर ते 18 डिसेंबर पर्यंत सुरू असलेला,श्री.संत ज्ञानेश्वर माऊली संजीवनी समाधी सोहळा “स्मरणोत्सव” अन्वये अखंड ज्ञानयज्ञ वारकरी हरीनाम किर्तनाने आज अखेर सांगता झाली.
श्री.केशवस्वामी देवस्थान मंदिर येथे दिनांक 9 डिसेंबर पासुन ब्रम्हमुहर्ता वर श्रीची कलश स्थापना ह.भ.प.बबलु महाराज यांचे हस्ते करून दररोज सकाळी काकड़ा भजन,सामुहिक ज्ञानेश्वरी ग्रंथचे पारायण आणी सामुहिक हरिपाठ ह भ पं. बबनजी महाराज यांनी केले.आज सकाळी श्री.केशवस्वामी देवस्थाना पासुन मिरवणुकीची शुरुवात केली आणी शहरात विविध ठिकाणी पुष्पवृष्टी व प्रसाद वाटप करून पालखीचे स्वागत करण्यात आले.
शहरातील प्रमुख मार्गावर पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.श्री केशवस्वामी मंदिरात पोहोचल्या नंतर परतल्यावर प.पू.श्री वासुदेव महाराज यांच्या दहीकाल्याचे कीर्तन ह.भ.प.वासुदेव महाराज टापरे यांच्या हस्ते करण्यात आले.
दिंडी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर श्री. केशवस्वामींचे दर्शन घेऊन दही काल्याचे किर्तनानंतर दहिकाला करण्यात आले.
यानंतर लगेच महाप्रसादाचा लाभ भक्तानी व गावकऱ्यांनी घेतला.याप्रसंगी माजी नगराध्यक्षा,माजी नगरसेविका,समाजसेविका व भक्त प्रेमी,श्री.केशवस्वामी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
पारशिवनी कार्यकारी विश्वस्त मंडळाच्या सर्वश्री भ.प. श्री.रामकृष्ण पुसदकर उमाकांत पालीवाल,प्रकाश डोमकी,नामदेवराव इंगळे,आनंदराव इंगुळकर,भास्करजी कावळे,नरेश डोनारकर,सुधाकर भुते,नानाजी मेंघरे,रमेश चकोले,तेजराम अपूरकर,विजय खेलोसिया,रामहरी दापूरकर,श्री. देवराज वारसाहस्ते,मनमोहक वारक-यांसह श्री.ज्ञानेश्वरी वारकरी महिला भजन मंडळ,सह पारशिवनी,पालोरा,पिपळा,करभाड,गरांडा,भागीमहारी,गुढरी वाधे,दिगलवाडी,आदी अनेक गावातील भजन गटांचा समावेश होता.
राधाबाई पुसदकर, रेखाबाई पादुरकर,प्रमिलाताई ब्राम्हटकर,मृणाली पुसदकर,प.पू. गुणाजी ब्रम्हटकर,प्रदिप बांगळकर,भोला सुर्यवशी,गोपाळ राजूरकर,गुलाबराव लोडेकर,बावन भोयर,भैय्याजी निशाणे,गजानन कठाणे,भास्कर कांबळे,ग्रामस्थ व मंदिर समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.