रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
काँग्रेस पक्ष गोरगरीबांच्या हितासाठी असून त्यांची उन्नती करण्यासाठी नेहमी प्राधान्य देतो आहे.काग्रेस पक्ष कधीच बनवाबनवी करत नाही तर बोलल्या प्रमाणे कृती करतोय,योजनांची अंमलबजावणी करतोय,योजना बंद करीत नाही…
तद्वतच भिसी वासियांच्या आवश्यक सर्व अडचणी दूर करण्यासाठी व भिसीवासियांना आवश्यक सुविधा देण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे आश्वासन डॉ.सतीश वारजूकर यांनी भरगच्च प्रचार सभेला संबोधित करताना आज आश्वासन दिले.
सभास्थळी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य ओबीसी सेल संघटक धनराज मुंगले,माजी जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा महासचिव गजानन बुटके,माजी सरपंच तथा समाजसेवक अरविंद रेवतकर, चिमूर तालुका शिवसेना अध्यक्ष भाऊराव ठोंबरे, काँग्रेस पक्षाचे चिमूर तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे,चिमूर तालुका उपाध्यक्ष दिपक ठोंबरे,काँग्रेस पक्ष पदाधिकारी माधुरीताई रेवतकर,मालाताई ऐरुणकर,वनिताताई झिंगरे,दुर्गाताई दिघोरे,बर्षाताई शिवरकर,माजी पस.सदस्य प्रदीप कामडी,उपाध्यक्ष सचिन गाडीवार,विजय मेहरे,मनोज दिघोरे,राहुल दिघोरे,ललित डुकरे,गोविंदा खवसे,जगत तांबे,देवा घुटके,ज्योतीताई मुंगले आदी मान्यवर उपस्थित होते.
भिसी वासीयांचा प्रचार सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून डॉ.सतीश वारजूकरांच्या मनोगताला उपस्थित बंधू भगिनी भरभरून साद देत होते.
यावेळी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेल महाराष्ट्र संघटक धनराज मुंगले व माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके आणि इतरांचे दमदार भाषणे झालीत.
काँग्रेस पक्षाचे चिमूर विधानसभा उमेदवार डॉ.सतीश वारजूकर प्रचार सभेला संबोधित करताना म्हणाले की,पोलीस ग्राउंड साठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार व भिसीची आरोग्य यंत्रणा जनसेवे करीता सज्ज करणार,गोरगरीब मुलांच्या आवश्यक शिक्षणासाठी भिसीत शिक्षण केंद्रे उभारणार,भिसीत मुबलक प्रमाणात पाण्याची सुविधा उपलब्ध करणार,भिसी वासीयांना मालकी हक्क पट्टे १०० दिवसात मिळवून देणार,आणि इतर सर्व सुविधा देणार असे आश्वासन त्यांनी दिले.
याचबरोबर महीला भगिनींना दरमहा ३ हजार रुपये देणे,महाराष्ट्र राज्यात महिलांसाठी विनामूल्य बस सेवा सुरु करणे,बेरोजगारांना दरमहा ४ हजार रुपये देणे,शेतकऱ्यांचे ३ लाख रुपये पर्यंतचे कर्ज माफ करणे,२५ लाख रुपयांचा आरोग्य विमा देणे,महाराष्ट्र राज्यात २ लाख ५० हजार बेरोजगारांना नौकरी देणे,यासह अनेक योजना लागू करण्यात येणार असल्याचे देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या वचननामा प्रमाणे उपस्थितांना डॉ.सतीश वारजूकरांनी माहिती दिली.
याचबरोबर भिसीला पुर्ण तालुक्याचा दर्जा मिळवून देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सभेला उपस्थित प्रचंड जनसमुदायस हा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी भक्कम विजयीश्री ठरु शकतोय,असे संकेत आहेत.