इंदापूर येथे आज परिवर्तन विकास पॅनलचे उमेदवार प्रवीण भैया माने यांच्या प्रचाराची आज सांगता सभा… — प्रियदर्शनी इंग्लिश मेडिकल स्कूल समोरील मैदानावर दुपारी 1वाजता होणार आहे!…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

                इंदापूर तालुका परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार प्रवीण भैया माने यांच्या आज प्रचाराची सांगता सभा इंदापूर येथील प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावरती आज सोमवारी (दि.18) दुपारी 1वा. आयोजित करण्यात आली आहे. 

         या सभेला प्रमुख उपस्थिती अपक्ष उमेदवार प्रवीण भय्या माने व तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

           याकडे इंदापूर तालुक्यावर विशेष लक्ष असल्याने प्रवीण भय्या माने ते या सभेत विरोधकांवर कोणती तोफ डागणार? याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

           सध्या अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थांचे प्रवीण भैया माने यांना शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पाठिंबा दिल्यामुळे परिवर्तन विकास पॅनलची इंदापूर तालुक्यामध्ये चांगलीच लाट निर्माण झालेली आहे. 

        तसेच प्रवीण भैया माने यांचे बद्दलही मतदारांमध्ये सहानुभूती दिसून येत आहे. 

           अपक्ष उमेदवार प्रवीण भैया माने हे इंदापूर तालुका विधानसभेवर निवडूनच येणार असल्याचे चित्र दिसू लागलेले आहे.        

          इंदापूर तालुक्यामध्ये निवडणुक प्रचार दौऱ्यास जनतेकडून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. 

        अपक्ष उमेदवार प्रवीण भैया माने हे आज इंदापूरच्या प्रचाराच्या या सांगता सभेत काय बोलतात? याकडे इंदापूर तालुक्याचे लक्ष लागून राहीले आहे. 

            परिवर्तन विकास पॅनलचे अपक्ष उमेदवार प्रवीण भैया माने यांच्या प्रचारासाठी होणाऱ्या ऐतिहासिक सभेस इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परिवर्तन विकास पॅनलच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

चौकट 

       अपक्ष उमेदवार प्रवीण भैया माने यांचेबद्दल गेल्या काही दिवसांपासून जनतेमध्ये मोठी सहानभूती दिसून येत आहे. या सहानुभूतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, प्रवीण भैय्या माने यांच्यासाठी जनतेने व युवकांनी निवडणूक हाती घेतल्याचे चित्र दिसत आहे. तसेच चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे. 

           तसेच दुसऱ्या बाजूला त्यांचे वडील माजी सैनिक दशरथ दादा माने यांनी आपला मुलगा इंदापूर विधानसभेच्या रिंगणात उभा असल्यामुळे यांनी इंदापूरच्या या निवडणुकीत विशेष लक्ष घातले आहे, त्यामुळे इंदापूर तालुक्यातील वातावरण किटलीमय झालेले आहे. 

           प्रवीण भैया माने यांच्या होणाऱ्या प्रचाराच्या या सांगता सभेने गावा-गावातील कार्यकर्त्यांना आणखी ऊर्जा प्राप्त होणार आहे. 

           शेवटी आज सांगता सभेत दशरथ दादा माने हे काय उद्देशून मतदारांना आवाहन करतील व विरोधकावर कोणती तोफ डागणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहेत.