जातीच्या व धर्माच्या आधारावरील लोकशाहीतील निवडणुका अर्थात मतदान यातून लोकशाही आणि जनतेचा कधीच विकास होऊ शकत नाही तर केवळ कोरड्या अहंकाराच्या व्यतिरिक्त निवडणुकीनंतर “भकासा ” शिवाय काहीही हाती लागत नाही,याचा अनुभव गेल्या 70 वर्षात आपण घेत आलेलो आहोत.
“सामाजिक आणि आर्थिक लोकशाही जोपर्यंत शिल्लक असेल,तोपर्यंतच राजकीय लोकशाही टिकेल..”
डॉ.बाबासाहेब आंबेडकर…
गेल्या 70 वर्षातील सामाजिक लोकशाहीची अविष्कारीता झाली का?
या प्रश्नाचे उत्तर म्हणजे दीड वर्षांपासून जळणारे मणिपूर आणि संपूर्ण देशातील बहुसंख्यांककडून अल्पसंख्यांकांवर विविध प्रकारचे होणारे अत्याचार.
आर्थिक लोकशाहीची अविष्कारीता झाली का?
या प्रश्नाचे उत्तर म्हणजे गेल्या 70 वर्षात लाखो शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामुळे झालेल्या आत्महत्या आणि अदानी, अंबानी,सारख्याच्या हातात देशाच्या अर्थव्यवस्थेचे रिमोट कंट्रोल आणि यांच्यापुढे सरकारची हतबलता. म्हणजेच ” INDIA अर्थात भारत ” नसून आता…
” इंडिया अर्थात भांडवलशाही प्रायव्हेट लिमिटेड “
हे समीकरण झालेले आहे!
हे कधी झाले आम्हाला ( भारतीय जनतेला) कळलेच नाही.
त्यामुळे आता आमची राजकीय लोकशाही म्हणजे मतदानाचा हक्क सुद्धा EVM च्या माध्यमातून हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला आहे.पण तरी सुद्धा या EVM चेच बटण दाबून या अंधुक झालेल्या राजकीय लोकशाहीत जबाबदारी पार पाडावी लागणार आहे!
तरी सुद्धा या राजकीय लोकशाहीतील हा मताचा अधिकार आकर्षित करण्यासाठी लाडक्या बहिणीचा पुळका येऊन 1500×5=7500/- दिले.याचा अर्थ स्पष्ट आहे की,हा मताचा अधिकार सुद्धा किती दिवस टिकेल आणि राजकीय लोकशाही अदृश्य होईल,याची शाश्वती राहिलेली नाही.
म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वरील इशारा महत्वाचा आहे.
बरं हे सर्व70 वर्षांच्या शेवटी एकदमच घडलं का? नाही तर संविधान विरोधी शक्तीने अर्थात आत्ताच्या RSS ने सुरुवातीला गोगल गायीची गती घेतली…
नंतर कासवाची गती घेतली….
त्यानंतर 2014 पासून सशाची गती घेतली…
आणि आता 2019 पासून कोरोनाची गती घेतली….
चंद्राबाबू आणि नितीशबाबू या दोन बाबुनी कोरोनाची लस निर्माण करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतू त्या सुद्धा डुप्लिकेट निघाल्या….
त्यामुळे कोरोनाची गती थोडीशी धिमी जरी झालेली असली तरी ती थांबलेली नाही, तर ती केवळ महाराष्ट्राच्या निवडणुकीतूनच त्याची गती एकतर प्रकाशकिरणासारखी होईल अथवा कासवगतीत रूपांतर होईल.हे मात्र महाराष्ट्रीयन मतदारावर अवलंबून आहे….
येथील RSS /भाजपने सर्वोच्च न्यायालय,RBI,CBI,IT,CAG, राष्ट्रपती,राज्यपाल,मुख्य निवडणूक आयोग यांना सत्तेच्या बळावर गुलाम बनविले.शेवटी यांच्याच माध्यमातूम EVM द्वारे निवडणुका घेऊन शेवटी मतदारांना सुद्धा गुलाम बनवून टाकले!
अशा बटीक झालेल्या व्यवस्थेला,वठणीवर आणण्याचा जो कांही आपल्या हातात यांनी शिल्लक ठेवलेला उपाय आहे,त्या मताच्या अधिकाराचा म्हणजे EVM चे बटण दाबन्याचा जो अधिकार आहे.तो केवळ….
एका सेकंदाचा
आहे……..
तो एक सेकंद आमचा महाराष्ट्र,देश आणि आमचे जीवन वाचवू शकतो…….. परंतू ,त्या सेकंदात…….
लाडक्या बहिणींनो 1500×5=7500/- विसरून जा..
निवडणुकीनंतर येणारे 2100/- किंवा 3000/- रुपये सुद्धा विसरून जा…..
मतदारांनो जाती / धर्मही विसरून जा ( या नितिभ्रष्ट राजकारण्यांना जातीची कदर असती,तर सत्ताधारी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मराठा जातींचे असतांना मराठा आरक्षण आंदोलन चिघळले असते का?…
म्हणून परवाच्या दिवसभरातील प्रत्येक सेकंदातील महाराष्ट्रीयन जनतेचा मेंदू भ्रष्ट करण्यासाठीच आणि डोळस बनून जागृत न होण्यासाठीच येथील व्यवस्थेचे सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत!
परंतू ,महाराष्ट्रीयन मतदारांनो,आमच्या स्वतःच्या, कुटुंबाच्या,महाराष्ट्राच्या,देशाच्या,लोकशाहीच्या,संविधानाच्या अविष्कारितेसाठीच….
त्या सेकंदात मेंदू भ्रष्ट न होऊ देता डोळसतेने जागृत होऊन EVM चे बटण दाबा….
जागृतीचा लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689..