प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
महाराष्ट्र राज्यातील मतदार हे भाजपाच्या धर्म द्वंद परिभाषेतून व जातीभेदातंर्गत कुटनितीच्या मोहपाशातून बाहेर पडले असून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
यामुळे येत्या २० नोव्हेंबरला भाजपा व त्यांच्या मित्र पक्षांना महाराष्ट्र राज्याच्या सत्तेपासून दूर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचा कल मतदारांचा दिसतो आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा,यांच्यासह त्यांच्या केंद्रिय मंत्र्यांचे,त्यांच्या जातीयद्वेषी मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्र राज्यात अजिबात चालणार नाही आणि त्यांचा प्रभाव मतदारांवर पडणार नाही असे राजकीय चित्र महाराष्ट्रात अनुभवास येवू लागले आहे.
आयाबहिंनींसह महापुरुषांबाबत बेताल बोलून मानहानी करणाऱ्या आमदार व मंत्र्यांचे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण केले असल्याने महाराष्ट्र राज्यातील मतदार भाजपावर नाराज आहेत.
याचबरोबर भाजपाच्या महायुती सरकारने भरमसाठ महागाई वाढवून गरीबांचे जिवन जगणे मुश्किल केले.तद्वतच शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे सातत्याने भाव पाडून त्यांना हैराण केले,त्यांची आर्थिक स्थिती हालाखीची केली.
महाराष्ट्र राज्यातील संत-महापुरुषांच्या कल्याणकारी पुरोगामी विचारधारेला दाबण्याचा व कलाटणी देण्याचा प्रयत्न भाजपाच्या सत्ता काळात अनेकदा करण्यात आलाय.
भाजपाची बहुजन समाज विरोधी विचारधारा त्यांनी वारंवार उजागर केली.पण धर्म या शब्दाच्या मायाजाळात बहुजन समाजाने त्याही विचारधारेला पचविले.
मात्र,भाजपाची विचारधारा,भाजपाचे राजकारण,भाजपाचे सामाजिक नित्तीमुल्य,भाजपाचे उधोग धोरण,भाजपाची कंत्राट कार्यपद्धती,भाजपाची महागाई वाढवून गरीबांचे खिशे खाली करण्याची निती,भाजपाचे वांझोटे शेतकरी प्रेम,त्यांची बेरोजगारांचे आयुष्य बरबाद करणारणारी कुटनिती,त्यांची विद्यार्थ्यांना घुमवणारी बेशिस्त, महाराष्ट्रातील मतदारांनी चांगलेच ओळखले आहे.
तद्वतच माहायुतीच्या राजवटीत अन्याय आणि अत्याचार करणे वाल्यांकडे दुर्लक्ष केले जात होते.यामुळे त्यांचा,सत्तेचा माजही महाराष्ट्र राज्यातील आया बहिणींनी,नागरिकांनी,उघड्या डोळ्यांनी बघीतला आणि सहनही केलाय.
भाषण ऐकण्यासाठी उमेदवारांनीच मतदारांची सभेत गर्दी करणे,हा मतदारांना प्रभावीत करण्याचा भाग असला तरी कुणाला मत द्यायच हे प्रामुख्याने मतदार ठरवीत असल्याने,या विधानसभा निवडणुकीत भावनिक विचार चालणार नाही तर वास्तव विचार दमखम दाखवणार असल्याचे पुढे आले आहे.
विदर्भातील राजकीय वातावरण काँग्रेसच्या बाजूने असून त्यांचे सर्वात जास्त आमदार निवडून येणार अशी मतदारांत जागोजागी चर्चा आहे.
याचबरोबर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाही विदर्भातील मतदार साथ देणार असल्याने त्यांचेही चांगभले होणार आहे.
विदर्भातील सहा-सात मतदार संघात वंचितच्या उमेदवारांना दम दाखवीन्यासाठी विविध सामाजिक मतदारांचे सहकार्य मिळत आहे.
मात्र,महायुतीच्या सत्ता काळातील चुकांमुळे उभ्या महाराष्ट्रात भाजपा व त्यांच्या मित्र पक्षांना विधानसभा निवडणुक अवघड ठरू लागली आहे.यामुळे महाराष्ट्र राज्यात परत सत्तेत येण्याची त्यांची मनसुबे मतदार नाकारणार आहेत असेच राजकीय गुपीते आहेत.
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये तगडे आव्हान एकमेकांसमोर दिसत असले तरी महाविकास आघाडीलाच सत्ता स्थापन करण्याची संधी मतदार देणार आहेत,असाच मतदारांचा कल सांगतो आहे.