आळंदीत मुख्यमंत्र्यांकडून सर्व सामान्य नागरिकांसाठी दिवाळी गिफ्ट…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

आळंदी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेतर्फे खास सर्व सामान्य नागरिकांसाठी दिवाळी गिफ्ट पाठवण्यात आले आहे. फराळ, शुभेच्छा संदेश आणि राज्य-केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती पु्स्तिका अशा कीटचे आळंदीत शिवसेना (शिंदे गट) वतीने वाटप करण्यात येत आहे.

            माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, शहरप्रमुख राहुल चव्हाण, उपतालुका प्रमुख योगेश पगडे, विभागप्रमुख राहुल थोरवे, शिवसहकार उपतालुकाप्रमुख शंकर घेनंद, माऊली गुळुंजकर, प्रदीप कुऱ्हाडे, माजी उपसरपंच शिवाजी पगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

           या किटमध्ये मुख्यमंत्री यांचे दीपावली शुभेच्छा पत्र, फराळ तसेच महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत राज्यातील महिलांसाठी कल्याणकारी योजनांची तसेच केंद्र व राज्यातील शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती पुस्तके भेट देण्यात आली.

            ‘सर्वजण हिताय, सर्वजण सुखाय’ यावर आधारित आपल्या राज्यातील महायुतीचे सरकार काम करत आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या आयुष्यात तेजोमय व सुखाचे दिवस यावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार प्रयत्न करीत असल्याचे आळंदी शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण यांनी सांगितले.