दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
मनोज जरांगे पाटलांच्या नियोजनबद्ध कृतीमुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र शासन खडबडून जागे झाले आणि कामाला लागले.
तर दुसरीकडे ओबीसी-धनगर समाजाच्या आरक्षण मुद्द्यातंर्गत समाज शक्ती पुढे येवू लागली आहे,एकवटू लागली आहे.
एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाची यंत्रणा कामाला लागली आहे तर दुसरीकडे ओबीसींचे आरक्षण आहे तेवढेच कायम ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व पर्याय तपासली जात आहेत.
मात्र,महाराष्ट्र राज्यातंर्गत वरिष्ठ नेत्यांवरील अयोग्य अशा शाब्दिक चिखलफेकीने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सभ्यतेला गालबोट लागले.
कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात वैयक्तिक पातळीवर करण्यात आलेल्या शाब्दिक चिखलफेकी मुळें अनेकांची मने दुखावणारी व एकमेकांचा तिरस्कार करणारी ठरली.
याचबरोबर महापुरुषांची नाहक मानहानी करणारे मुद्दे समाजकंटकांद्वारे जाणिवपूर्वक उकरून काढल्याने सामाजिक व राजकीय वातावरण तापवले गेले.महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना अशांत केले गेले होते.
महाराष्ट्र राज्यात अँड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखे अभ्यासू,सतर्क,वजनदार आणि समजदार व्यक्तीत्व आणि नेतृत्व महाराष्ट्र राज्यात नसते तर खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक दंगली घडवून आणल्या गेल्या असत्या असे महाराष्ट्र राज्यातील अनेक प्रकरणावरून व घडामोडी वरुन लक्षात येते आहे.
जर का महाराष्ट्र राज्यात विविध मुद्यांवरुन जातीयदंगली झाल्या असत्या तर ते महाराष्ट्र राज्याला परवडणारे नव्हते.
कारण महाराष्ट्र राज्यातील समाजमने ही एकमेकांच्या बाबतीत तिरस्करणीय बनली असती आणि अनेक वर्षांपर्यंत तसीच राहिली असती.
म्हणूनच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना हिंसक प्रवृत्ती पासून वाचविले आणि महाराष्ट्र राज्याचा सभ्य सन्मान कायम ठेवला,हे महाराष्ट्र राज्यातील जनतेला कळले असेलच.
मात्र,महाराष्ट्र राज्यात मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींकडूनच अनेक मुद्यांवरुन द्वेष का म्हणून पसरविण्यात येत आहे?