ब्रेकिंग न्यूज… भर दुपारी केली वाघाने,बैलाची शिकार…  — थरकाप उडवणारी घटना.. — शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीचे काम सोडले..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:-पारशिवनी तालुक्यातंर्गत नागलवाडी बफर झोन अन्वये येणाऱ्या नरहर ढवलापूर शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून वाघाचा वावर आहे.

          आज भर दुपारी दोन वाजताच्या दरम्यान ढवलापुर येथिल शेतकरी सिताराम तुलाराम अडमाची हे आपले बैलाला शेतातून पाणी पाजण्याकरिता शेताजवळील नाल्यात नेले असता त्याच नाल्यात वाघ दबाधरुन बसून असल्याने त्याने बैलाला झडप घातली व बैलाची शिकार केली.

               बैल मालक सिताराम तुलाराम अडमाची यांनी प्रत्यक्ष डोळ्यासमोर बैलाला मारणारी थरारक घटना अनुभवली.या घटने नंतर आपला जिव कसेतरी वाचविले‌.मात्र बैल घटना स्थळी मृत झालाय.

           यामुळे या भागातील शेतकऱ्यांना वाघाच्या दहशतीत शेतीची कामे करणे कठीण झाले असून,नागरिकांत वाघाच्या वावराबाबत भीती निर्माण झाली आहे.

           वनविभागाने उपाययोजना करून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी मौजा ढवलापुर,नरहर घाटकुकडाचे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी केली आहे.

          मागील वर्षी सुध्दा ढवलापूर गावातील शेतकऱ्यांच्या अनेक बैलांची वाघाने शिकार केली होती.यावर्षी देखील या परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे. 

          भर दिवसांत दुपारी वाघ दिसत असल्याने शेतकऱ्यांनी शेतात जाणे सोडले आहे.सद्याच्यास्थितीत हा वाघ शेताच्या अवतीभोवती वावरत आहे.त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना शेतातील कामे करणे दुरापास्त झाले आहे.

**

वाघाला तात्काळ हाकलून लावा..

कोट..

             वनविभागाने वाघाला या परिसरातून हाकलून लावण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ढवलापुरच्या सरपंचा प्रिती मडावी,मिथुन उईके,रामकृष्ण भलावी,सहदेव नेटी,अरुण अडमाची,रामा भलावी,नीलेश उईके,प्रदीप धुर्वे यांच्यासह पिढीत शेतकऱ्यांनी केली आहे.

        पिढीत शेतकरी सिताराम तुलाराम अडमाची यांचे वाघ हल्ल्यात झालेल्या बैल मृत्यू नुकसानीची भरपाई देण्याची मागणी ढवलापुर नरहरचे वनरक्षक महाविर सुरपाम यांचे माध्यमातून वनपरिक्षेत्राधिकारी यांच्याकडे केली आहे.