धानोरा /भाविक करमनकर 

 

काल सायंकाळी सात वाजता काही लोकांना गडचिरोली वरून धानोरा येत असताना दूधमाळा ते काकडयेली या गावाजवळ वाघाचे दर्शन झाले यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तसेच काल रात्रो दूधमाळा येथे एका गाईवर हल्ला करून गाईला जखमी सुद्धा करण्यात आले कृष्णकांत मनीराम मडावी यांच्या मालकीची ती गाय होती गाय जखमी झाली ही माहिती वनविभागाला देण्यात आली.

    त्यामुळे वनविभागांनी प्रत्यक्ष मोक्यावर जाऊन गायीचा पंचनामा केला क्षेत्र सहायक डी एस आदे व वनरक्षक एन एन टोंगे यांनी रात्रोला जाऊन चौकशी केली असता गाय जखमी झाली होती रात्र असल्यामुळे पंचनामा करण्यात आला नव्हता गाय जखमी असल्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी कडे जाऊन उपचार करण्यास सांगितले व दुसऱ्या दिवशी 17/ 11/ 2022 ला मोक्यावर जखमी गाईचा पंचनामा करण्यात आला क्षेत्र सहाय्यक यांनी मोक्यावर जाऊन पंचनामा केला असता त्या ठिकाणी बिबट्याचे पंजाचे ठसे आढळून आले यावरून बिबट्या होय हे सिद्ध झाले गाईला मागच्या बाजूला व जबड्याला गंभीर जखम होती या बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे व नागरिकांचे सकाळी फिरायला जाणे सुद्धा बंद झालेआहे ही घटना गावाला लागून असलेल्या जंगलात कक्ष क्रमांक465 मध्ये घडून आली जेव्हा घटना घडली तेव्हा सर्व लोक जागे होते त्यामुळे गायीचे प्राण वाचले दुपारी बारा वाजता केळवतकर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी मोका स्थळाची पाहणी केली.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com