सामाजिक शास्त्र विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास घडणारे शास्त्र आहे :- डॉ.कुसुमेन्द्र सोनटक्के

युवराज डोंगरे /खल्लार 

          उपसंपादक

        छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा आज दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी सामाजिक शास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. कुसुमेंद्र सोनटक्के या. द. व. देशमुख कला वाणिज्य महाविद्यालय तिवसा हे उपस्थित होते.

          सामाजिक शास्त्र हे व्यक्तिमत्व विकास घडणारे शास्त्र आहे. सामाजिक क्षेत्राचा अभ्यास करून आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारी करणे शक्य होते. सामाजिक शास्त्राचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी चिंतन मनन करून प्रश्न निर्माण होतात व उत्तरे शोधण्यासाठी चिकित्सक बुद्धीचा वापर करून अभ्यास करता येतो.

         सामाजिक शास्त्र हे अभ्यासाबरोबर सामाजिक प्रश्नांची जाण ठेवणारे शास्त्र आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नवीन दृष्टीने वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होतो असे विचार डॉ.सोनटक्के यांनी मांडले. सामाजिक शास्त्राच्या समितीचे गठन करून वर्षभरातील सामाजिक शास्त्राच्या अभ्यास मंडळाने होणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन विशद करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र इचे उपस्थित होते.

            या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. आशिष काळे, डॉ. प्रविण सदार, डॉ. अतुल चऱ्हाटे. उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन बीए भाग तीन ची विद्यार्थिनी कु. आरती दाहे व संचालन सॅम्युअल गवई यांनी केले.