दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
डॉ.सतीश वारजूकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भिसी येथे अनेक महिलांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलाय.
चिमूर विधानसभा मतदारसंघात डॉ.सतीश वारजूकरांचे लोक हिताचे विविध कार्य बघता व लोकहितासाठी त्यांनी अनेकदा दिलेली मदत बघता त्यांच्यावर चिमूर विधानसभा मतदारसंघातील महिला-पुरुषांचा अगाढ विश्वास दृढ होत आहे.
डॉ.सतीश वारजूकर आपल्या संवेदनशील कर्तव्याद्वारे गोरगरीब जनतेचे तारणहार बनले असून त्यांच्या सारखा लोक नेता चिमूर विधानसभा मतदारसंघात सध्यातरी नाही.
त्यांचे लोक हिताचे अनेक कार्य व त्यांची सर्व नागरिकांच्या प्रती असलेली आस्था हेच त्यांच्या लोक विश्वाचे रहस्य आहे.
महिलांच्या पक्ष प्रवेशावेळी डॉ.सतीश वारजूकर,चिमूर तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे,चिमूर तालुका किसान सेलचे अध्यक्ष राजू कापसे,भिसी येथील सर्व पक्ष पदाधिकारी आवर्जून यावेळी हजर होते.