रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातंर्गत मौजा विहिरगाव हे अति दुर्गम आदिवासी मागासवर्गीय खेडेगाव आहे.
विहिरगाव येथील लोकसंख्या अंदाजे १ हजार ५०० असून त्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या खूप प्रमाणात आहे.
वीहिरगाव मध्ये रोजगाराशिवाय अन्य दुसरा कोणताही पर्याय नाही.त्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण करणे यासाठी तेथील नागरिकांना रोजगाराची अत्यंत आवश्यकता आहे.
विहिरगाव येथे वन विभागाच्या वतीने पर्यटन गेट झाले तर येथील सुरक्षित बेरोजगार युवकांना काम मिळून त्यांच्या उदरनिर्वाहाच्या प्रश्न सुटू शकतो.विहिरगाव येथील जंगल ताडोबा उद्यानाला लागून आहे व त्यात बेलारा,गोंडमोहाडी,मदनापूर,कोलारा,येथील पर्यटक विहिरगाव येथील जंगलात सफारी साठी येतात.या जंगलाचा फायदा इतर पर्यटन घेत आहेत.
जंगल विहिरगाव हद्दीतले आणि त्याचा फायदा इतर पर्यटन गेटला मिळत आहे.म्हणून गावकऱ्यानी विहिरगाव येथे पर्यटन गेटची मागणी केली आहे.
या मागणीचे निवेदन आज विहीरगांव येथे ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ. सतीश वारजूकर यांना दिले.
यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके,चिमूर तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ.विजय पाटील गावंडे,तालुका उपाध्यक्ष रहमान पठाण,सुभाष बनसोड,किसन दांडेकर,सरपंच शितल मुंडरे,उपसरपंच मधुकर गजबे व गावातील बेरोजगार युवक उपस्थित होते.