बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रम…

ऋषी सहारे

संपादक

आरमोरी –

     कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन, दिल्ली आणि अभिनव बहुउद्देशीय कला मंच गडचिरोली यांचे वतीने गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील आदिवासी, ग्रामीण भागातील २५ गावांमध्ये १६ आक्टोंबर बाल विवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

       त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शपथ देणे, रॅली काढणे तसेच गावातील महिला, युवक, युवती यांचे सहकार्याने कॅंडल मार्च काढणे, जेणेकरून गावातील लोकांना बाल विवाहाचे दुष्परिणाम काय आहेत, मुलींचे लग्न १८ वर्षांपूर्वी करू नये तसेच मुलाचे लग्न २१ वर्षांपूर्वी करू नये याची माहिती व्हावी व बाल विवाह प्रथेला आळा बसावा.

       बाल विवाह मुक्त भारत अभियानात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,पेसा मोबिलायझर, उमेद प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे नियोजन अकिल शेख सचिव-अभिनव बहुउद्देशीय कला मंच गडचिरोली यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्ये निकेश ताडाम, प्रेमिला कुमोटी, मंदिरा किरंगे यांनी परिश्रम घेतले.